जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
संबंधित काम आपल्याकडे नसल्याचे सांगितल्याचा राग आल्याने जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन भा. पाटील यांनी कार्यालयातील उद्योग निरीक्षकाला जातीवाचक बोलल्याने त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ ऑगस्ट रोजी घडली होती.[ads id="ads1"]
या संदर्भात अनिल गाढे यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते जिल्हा उद्योग केंद्रामध्ये उद्योग निरीक्षक म्हणून नोकरीस आहे. १३ ऑगस्ट रोजी कार्यालयात माहिती अधिकाराच्या कामकाजासाठी काही जण आले होते. ते महाव्यवस्थापकांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांना अनिल गाढे यांना भेटा असे सांगितले. त्यानुसार तिघे जण गाढे यांच्याकडे गेले. परंतु त्या कामाविषयीचा टेबल आपल्याकडे नसल्याचे सांगितल्यान महाव्यवस्थापक चेतन पाटील यांना जातीवाचक उद्देशाने बोलून अपमानीत केले.[ads id="ads2"]
गाढे यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतचा तपास उपविभागीय पोलिस अधीकारी संदिप गावीत करीत आहेत.