जिल्हा परिषद मराठी शाळा विवरे येथे शाळेच्या आवारात झाड पडलेले उपसरपंच विनोद मोरे मुख्याध्यापक मीनाक्षी पाटील शिक्षक अविनाश बागुल शालेय समिती अध्यक्ष दिनेश टेंपे पाहणी करताना |
रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील विवरे येथे दि.२४ सप्टेंबर मंगळवार रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यसह विजेच्या कडकडात जोरदार पाऊस झाला यात वादळा चा वेग जास्त असल्या मुळे अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये गावात व परिसरात झाडांची पडझड झाली त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. [ads id="ads1"]
अनेक ठिकाणी तार तुटल्या मुळे विजरोहित्र बंद करण्यात आले होते . जि. प. मराठी शाळेत सुद्धा झाडांची पड झड झाली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.[ads id="ads2"]
रावेर विवरा रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडे तुटून पडली होती आज दिवस भर फांद्या ची तोड करण्यात आली अजून दोन दिवसा पर्यंत हवामान खात्या कडून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारा देण्यात आलेला आहे