महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी रावेर येथील माता जिजाऊ पुतळ्याजवळ शेतकरी संघर्ष समिती एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार



     रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) मालवण येथील राजे छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी रावेर तालुका शेतकरी संघर्ष समिती चे वतीने दि.३/९/२०२४ रोजी जिजाऊ माता पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन मा. तहसीलदार रावेर व मा.पोलिस निरीक्षक सो रावेर यांना देण्यात आले आहे.[ads id="ads1"] 

       निवेदनात असे म्हटले आहे की, शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेलेले गड किल्ले उन,वारा,पावसात शेकडो वर्षांपासून दिमाखात उभे आहेत मात्र महाराष्ट्र शासनाने बांधलेला राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठच महिन्यात जमीनदोस्त झाला. यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहचली असुन, राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान झाला असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. छञपती शिवाजी महाराजांचा नावाने मताचे राजकारण करणाऱ्या ढोंगी शिवप्रेमी असलेल्या शिवद्रोही सरकारने भ्रष्टाचार केल्यानेच हा पुतळा पडला असल्याने या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी.[ads id="ads2"] 

   व नैतिकतेच्या आधारावर महाराष्ट्र चे निष्क्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दि.३/९/२०२४ वार मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेपासून जिजाऊ नगर, जुना सावदा रोड येथील जिजाऊ माता पुतळ्या जवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून रावेर यावल तालुक्यातील समस्त शिवप्रेमी जनतेने या निषेध आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघर्ष समिती चे सुरेश चिंधु पाटील, आर.के.चौधरी,ॲड जे जी पाटील, प्रदिप सपकाळे, दिलीप साबळे, दिनेश सैमिरे यांनी केले आहे.



जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️