जि.प.उर्दु व अँग्लो उर्दु हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करत व्यक्त केली कृतज्ञता


  रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : 

रावेर शहर व तालुक्यातील जि.प.उर्दु व अँग्लो उर्दु हायस्कूल विद्यालयाचे किमान 30 वर्षांपूर्वीचे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या माजी गुरुजनांन बद्दल एक आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली.

संत कबीर म्हणतात "गुरुबीन कोन दिखावे बाट ! बहुत बडा यमघाट". म्हणजेच जीवनातील उंच शिखरावर जाण्यासाठी गुरु म्हणजे शिक्षक हाच वाद सुरू आहे. त्याच्या यशस्वी मार्गदर्शनाने कठीण यमघाट म्हणजे यशोशिखर गाठता येते.[ads id="ads1"] 

   तीस वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या माजी गुरुजनांनाबद्दल भेटून व कृतज्ञता व्यक्त करण्याची नियोजनपूर्वक अनेक विद्यार्थ्यांची अनेक महिन्यापासून संपर्क करत अपूर्व भेट घडून आणली. कार्यक्रमाचे अध्यक्ष के. एम शेख होते तर अतिथीरूपात शफियोद्दिन शेख,सलीम शेख,नजीर अहमद शेख,रज्जाक परवाज सर,शफयुद्दीन सर,अर्शद सर,सलीम सर,नासिर खान,शकील सर, सरफराज सर,गुलामगौस सरअजिज सर,जावेद सर,इक्बाल सर,इक्बाल काजी, समद जनाब,शकील जनाब,युसुफ जनाब,अय्युब जनाब,संजिदा मॅडम,असलम जनाब,शिक्षणप्रेमी शिक्षक वृंद अतिथी रूपात विराजमान झाले होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन माजीविद्यार्थी शफीक जनाब यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने करण्यात आले.[ads id="ads2"] 

माजी शिक्षकांची रावेर शहरात अब्दुल लतिफ हॉल नेताना गुलाबपुष्प उधळत नेऊन त्यांच्या केलेल्या कृतीची उजळणी करून त्यांच्या ऋणाची उतराई म्हणून विचारातून कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या भेटीने आनंदाश्रू दोन्हींच्या नयनात विराजमान झाले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष के एम शेख यांचा सह सर्व माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि दुर्रेयातिम हे पुस्तक देऊन हदय सत्कार यांचा माजी विद्यार्थ्यांनी केला.स्नेहसंमेलन व सत्कार सोहळ्यात माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या अध्यापन व शिस्त याबाबत गौरवोद्गार काढले. अध्यक्षीय भाषणात कादिर सर म्हणाले की माजी विद्यार्थ्यांनी गरु शिष्यांची भेट घडवन एक

मोठी भेट दिली तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मिळालेले यश व आपण ज्या पदावर कार्यरत आहात ते पुढच्या पिढीला प्रेरणादायी राहील असे सांगितले.तर शफीयोद्दीन शेख यांनी सांगितले की माजी विद्यार्थ्यांनी आमचा हदय सत्कार करत आज आपण माजी मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून जुन्या आठवणींना उजाळा देत एक भव्यदिव्य कार्यक्रम घडवून आणला निश्चितच हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे असे सांगत माजी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले. यशस्वीतेसाठी शिक्षक शेख रईस,शेख अकील,  रईसखान,एजाज,चिराग,

अशफाक,शफिक सर,माजिद सर,रशीद भाई,रहमान मलिक

उस्मान भाई,जमील भाई

महमूद खान,न्याज मोहम्मद

गुलजार भाई,फरीद कुरेशी

तसलीम कुरेशी,हमीद भाई

शकील भाई,फिरोज भाई

अजगर भाई,इस्माईल भाई

शेरखान,जावेद खान

फारुख भाई,लतीफ भाई

निजाम भाई,अहतेशाम भाई,तारीख भाई,अख्तर भाई

आरिफ भाई सह अनेक माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शफीक सर तर प्रस्तावीक रईस सर व 

आभार अशपाक शेख यांनी मानले

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️