ऐनपूर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील रहिवासी रफिक करामत खान यांची आई हसनूर बी करामत खान उमरा व हज साठी रवाना होणार आहे.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे कि रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील रहिवासी तसेच ठेकेदार रफिक करामत खान यांनी आपल्या आई हसनूर बी यांना उमरा करण्याबाबत निश्चय केला होता कि, आपल्या आईस आपल्या मेहनतीच्या रकमेने उमरा व हज करण्यासाठी पाठवणार त्यासाठी रफिक खान यांनी खूप मेहनत आणि कष्ट घेतले दिवस रात्र राबून रक्कम गोळा केली तसेच जिद्द, मेहनत आणि निश्चय केल्या प्रमाणे आपल्या आई हसनूर बी करामत खान हे उमरा व हज साठी दि. 17 सप्टेंबर रोजी ऐनपूर येथून संध्याकाळी मुंबई कडे रवाना होणार आहेत. मुंबई येथून विमानाने प्रवास करणार आहेत.[ads id="ads2"]
या निमित्त त्यांनी ऐनपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भोजनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमात त्यांनी सर्व नातेवाईक व गावातील नागरिकांच्या भेट घेतली या निमित्ताने रफिक करामत खान यांचे अभिनंदन केले जाते आहे