ज्ञानेश्वर महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा : श्री स्वामी समर्थ गुरुपीठ भाविकांची मागणी


यावल ( सुरेश पाटील )

ज्ञानेश महाराव यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखा यावल येथील एकूण ४० स्री - पुरुषांसह तरुण भाविकांनी यावल तहसीलदार व यावल पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली.[ads id="ads1"] 

यावल निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते व यावल पोलीस  निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना आज शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४ दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,

दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेनात ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ हा काल परवापासुन सोशल मिडीयावर व्हायरल झाला.[ads id="ads2"] 

  सदर भाषणातून आमच्या हिंदु धर्माचे आराध्य दैवत प्रभु श्री राम तसेच श्री स्वामी समर्थ महाराज व इतर संतांच्या बाबतीत आक्षेपहार्य वक्तव्य केले यामुळे आम्ही सर्व सखल हिंदु समाजाच्या,सर्व सेवेकऱ्यांच्या,भाविक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर इसमाने आपल्या भाषणातुन आमच्या अस्मितेची व श्रध्देची टिंगल केलेली दिसुन येत आहे. सदर गोष्टींची चित्रफित ही सर्व सोशल मिडीयाच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रात प्रसारित झालेली आहे.तरी आम्ही सर्व सखल हिंदु धर्माच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो व ज्ञानेश महाराव यांचेवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करावी.तसेचयापुढेही हिंदु धर्माविषयी व हिंदु देवतांच्या तसेच संतांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे भावना व श्रध्दा दुखीत होणारे वक्तव्य करणार नाही. म्हणुन ज्ञानेश महाराव यांना

अटक करुन कठोर शिक्षा होणे बाबत कार्यवाही करावी असे नमूद केले असून निवेदनावर यावल शाखेतील सुभाष बोरसे अरुण गडे चेतन भंगाळे यांच्यासह एकूण ४० स्री - पुरुष तरुण भाविकांनी आपली स्वाक्षरी केली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️