भ्रष्टाचार उघडकीस आणणारे विठोबा द्यानद्यान यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी

 


माहिती अधिकार कायदा निस्वार्थी चळवळ पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी

यावल  (सुरेश पाटील) :

लोकशाही मार्गाने भ्रष्टाचार विरोधात काम करणारे माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान या दिव्यांग व्यक्तीस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने महाराष्ट्र राज्यातून माहिती अधिकार कायदा निस्वार्थ चळवळ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन ईमेल करून धमकी देणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

नाशिक जिल्ह्यातील टोकडे गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अनुचित प्रकार तसेच भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आले असता त्या संबंधित सामाजिक कार्यकर्ते

तसेच वेळोवेळी अनेक भ्रष्टाचार संबंधी आवाज उठविणारे जनजागृती करणारे संबंधित प्रकरणात राहुल प्रकाश डिंगर व इतर तक्रारदार यांनी विठोबा द्यानद्यान यांना अरेरावीच्या भाषेत शिवीगाळ केली तसेच जीवे मारून टाकण्याची धमकी देण्यात आली तसेच लंगड्या तुला बघून घेऊ असे म्हणून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले व त्यांना मानसिक त्रास देण्यात आला तरी संबंधित प्रकरणात तात्काळ चौकशी करण्यात यावी व दिव्यांग तक्रारदार विठोबा द्यानद्यान यांना न्याय मिळवून देण्यात यावा व संबंधितांवर दिव्यांग अपंग ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, तक्रारदार हे संपूर्णपणे जनहितार्थ कामे यापूर्वीही केले आहे व करत आहे व व्यापक स्वरूपाचे सामाजिक जनहित या मार्फत साधले जाते तसेच तक्रारदार यांनी अनेक aप्रकरणांत प्रभावशील असलेल्या लोकसेवकांचे देखील अनेक भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण उघडकीस आणून त्यांच्यावर शिक्षेची कारवाई व तसेच सेवेतून बडतर्फ केलेले आहे.[ads id="ads2"] 

  व कायम जनहिताचे काम करत आहेत तरी सदरील आरोपी यांनी सामाजिक आणि दिव्यांग असलेले कार्यकर्ते यांना धमकी देऊन पूर्ण त्यांचे खच्चीकरण करण्याचा व त्यांना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचे दिसून येत आहे तरी आपण आपल्या स्तरावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी जेणेकरून सामाजिक कार्यकर्ता हा समाजसेवा करताना व जनहित साध्य करताना टिकला पाहिजे अन्यथा माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ मार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रशासना विरोधात विविध मार्गाने आंदोलन पुकारण्यात येतील याची आपण कटाक्षाने दक्षता घ्यावी. आणि आपण धमकी देणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई न केल्यास महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते प्रशासनाविरोधात आंदोलन करतील असा इशारा राज्यातील माहिती अधिकार कायदा निस्वार्थ चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला असून शेकडो कार्यकर्त्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना ईमेल द्वारा व प्रत्यक्ष लेखी स्वरुपात तक्रारी करून मागणी केली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️