खिर्डी ते बलवाडी रस्त्यावर झाडे झुडपे वाढल्याने अपघात होण्याची दाट शक्यता : संबंधित विभागाचे दुर्लक्ष

  


 (जळगाव जिल्हा ब्युरो चिफ हमीद तडवी) : रावेर तालुक्यातील खिर्डी ते बलवाडी रस्त्यावर अनेक ठिकाणीं वृक्षांच्या फांदया  लोंबकळत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता भासु लागली आहे. जेव्हा अपघात होईल तेव्हाच संबंधित बांधकाम विभागाला जाग येईल का? असा सवाल परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे.[ads id="ads1"] 

 खिर्डी ते बलवाडी रस्त्यावर अनेक ठिकाणीं वृक्षांच्या फांदया लोंबकळत असून केळीची मालवाहतूक ट्रक येजा करत असून सदरील फांद्या अर्धवट अवस्थेत तुटून लोंबकळत असतात,अशी परिस्थिती रावेर तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांची झाली आहे.  जोराचा वारा आल्यास कुणाच्या अंगावर झाड, फांद्या केव्हा पडतील याचा नेम नाही. [ads id="ads2"] 

  झाडांच्या फांद्या पडल्यास मोठा अपघात होवून जीवितहानी होण्याचा शक्यता वर्तविण्यात येत आहे या रस्त्यावर काही जिवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असेही तालुक्यातील जनतेकडून बोलले जात आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देवून रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडाव्यात. आणि रहदारीचा मार्ग मोकळा करावा अशी रास्त स्वरुपाची मागणी खिर्डी बलवाडी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️