रावेर येथील कंत्राटी सफाई कामगारांचे आस्था स्वंयम रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात 2 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी दि . 5 पासून आस्था स्वयम रोजगार सेवा सहकारी संस्था धुळे ठेकेदाराच्या  मनमानी कारभाराच्या विरोधात काम बंद आंदोलन सुरू केल्याने शहरात  2 दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले होते आज पासुन नगर परिषदेने कायम सफाई कामगारांना कामावर पाठवून शहरवासीयांना थोडासा दिलासा दिला आहे परंतु दोन दिवसांपासून  घरा -घरामध्ये पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे याकडे देखील नगर परिषदेने लक्ष देण्याची मागणी शहरवासी करीत आहे.[ads id="ads1"] 

रावेर  नगर परिषदेचा सफाई करण्याचा ठेका आस्था स्वयंम रोजगार संस्था धुळे या संस्थेने   घेतला आहे. ठेका घेतल्या पासून असंघटीत सफाई कामगार यांना शासनाच्या नियामनुसार रोजंदारी देण्यात येत नाही, तसेच, सुरक्षा कीट पावसाळ्यात रेन कोट, गम बूट, आदी कोणत्याही सुख-सुविधा दिल्या जात नाही. रोजंदारी देखील नियमाप्रमाणे व नियमित दिली जात नाही. प्रत्येक कामगाराचा पी . एफ .ठेकेदाराने भरावा असा नियम असताना आता पर्यंत ठेकेदाराने एका ही सफाई कामगाराचा पी. एफ, ई. एस. आय भरलेला नाही, तसेच, विमा सुरक्षा कवच देखील कामगारांना लागू नाही.[ads id="ads2"] 

   एखाद्या सफाई कामगाराला जबर जखम झाल्यास त्याला स्वतः उपचार करावा लागतो. संस्थेचे सफाई कामगार असल्याचा पुरावा म्हणून आय कार्ड, ड्रेस देखील दिलेले नाही. याच्या विरोधात कंत्राटी सफाई कामगारांनी  एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, सावन मेढे, धुमा तायडे यांच्या नेतृत्वात तहसिलदार बंडू कापसे यांना निवेदन देवून आस्था संस्थेच्या ठेकेदारांवर कडक कारवाई व काळ्या यादीत(Black List)टाकण्यात यावे अशी मागणी करून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे . या आंदोलनाच्या निवेदनाच्या प्रती कामगार आयुक्त, बबनराव काकडे उपविभागिय अधिकारी फैजपुर , मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे . 

यावेळी  गौतम गजरे, अजय मेढे , योगेश महाजन, प्रमोद सोनवणे, शुभम घेटे,प्रकाश लहासे, अर्जुन छपरीबंद, चेतन घेटे, सागर तायडे आदींसह असंख्य असंघटित सफाई कामगार उपस्थित होते .

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️