रावेर विधानसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून दारा मोहम्मद यांच्यासह चार उमेदवार इच्छुक : पत्रकार परिषदेत दिली माहिती

 


 जिल्ह्यात मुस्लिमांना उमेदवारी दिल्यास दारा मोहम्मद ९०% निवडून येण्याची खात्री

यावल  ( सुरेश पाटील ) रावेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे लोकप्रिय असलेले आणि विकास कामांना प्राधान्य देणारे रावेर येथील माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ४ कट्टर समर्थक पदाधिकारी इच्छुक असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात दिली असली तरी महाराष्ट्र राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्व जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांना उमेदवारी देण्याबाबत विचार मंथन करीत असल्याने आणि प्रदेश स्तरावरून तसा निर्णय घेतल्यास रावेर विधानसभा मतदारसंघातून दारा मोहम्मद निवडून येण्याची 90% खात्री रावेर विधानसभा मतदारसंघातून व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"] 

           रावेर विधानसभा मतदारसंघात वारंवार एकाच कुटुंबातील घरातील उमेदवार नको,सतत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणारा तसेच मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणून विकास करणारा भावी आमदारासाठी नवीन होतकरू लोकप्रिय उमेदवार पाहिजे,नागरिकांना आमदाराच्या घरी फेऱ्या मारण्याची वेळ पडायला नको, मतदारांच्या घरापर्यंत जाणारा आमदार पाहिजे अशा प्रकारच्या सर्व सामान्य नागरिकांच्या अपेक्षा संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघातून व्यक्त केल्या जात असल्याने रावेर विधानसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवीन उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्यास रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद ज्ञानेश्वर महाजन,इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील,जिल्हा बँकेचे संचालक राजीव पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे इच्छुक उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी शेवटी पक्षश्रेष्ठीचा निर्णय मान्य राहणार असल्याची माहिती या चारही प्रबळ असलेल्या इच्छुक उमेदवारांनी पत्रकार परिषदेत दिली.[ads id="ads2"] 

            रावेर विधानसभा मतदारसंघात आमदार शिरीषदादा चौधरी हे त्यांचे चिरंजीव धनंजय चौधरी यांच्या माध्यमातून आपला राजकीय वारसा चालवणार असल्याचे रावेर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण निर्मिती झाली असली तरी विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या मतदारसंघातील आपल्या ज्येष्ठ कट्टर समर्थक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाजातील मान्यवरांना विश्वासात घेऊन धनंजयला राजकीय वारसा म्हणून राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला आहे का..? असा प्रश्न मतदारसंघात उपस्थित केला जात असून मतदारसंघातील राज्यातील जिल्ह्यातील राजकीय गट प्रभाव आणि राजकारण लक्षात घेता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश स्तरावरील ज्येष्ठ नेते मंडळी तिकीट वाटप करताना कोणाला संधी देणार..? आणि नवीन उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय घेतल्यास मतदार संघातून दारा मोहम्मद ज्ञानेश्वर महाजन भगतसिंग पाटील राजीव पाटील आणि चारही जण इच्छुक असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माहिती दिली.

           यावल येथे पत्रकार परिषदेत दारा मोहम्मद आले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचे हितचिंतक तसेच काँग्रेस पक्षातील कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष मुस्तफा खान शेठ,आर.के चौधरी, माजी शहराध्यक्ष अन्सार खान, अशपाक भाई प्रदीप सिंह पाटील समाधान पाटील इत्यादी काँग्रेस कट्टर समर्थक उपस्थित होते. 

           सर्व जिल्ह्यात मुस्लिमांना उमेदवारी द्या काँग्रेसमध्ये दबाव वाढला - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम-दलित-मराठा अशी मतपेढी महाविकास आघाडीच्या बाजूला झुकल्याचे दिसल्यानंतर मुस्लिम लोकसंख्या गृहीत धरून प्रत्येक जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी अशी मागणी काँग्रेसकडे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि तसे वृत्त विश्वसनीय वृत्त काल ९ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यस्तरीय दैनिकात प्रसिद्ध झाले.

त्यामुळे रावेर विधानसभा मतदार संघातील सामाजिक आकडेवारी लक्षात घेतली असता मुस्लिम समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये असल्यास इतर समाजाच्या उमेदवाराला खूप मेहनत घ्यावी लागणार एवढे मात्र निश्चित झाले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️