दिनांक ९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा


यावल  ( सुरेश पाटील ) : शुक्रवार दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे

       पारोळा पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जळगाव जिल्ह्यातून ठिबक, तुषार संच,अनुदान ,

पिक विमा ,अतिवृष्टी ,संपूर्ण कर्जमाफी, नारपार नदी जोड योजना, यासंदर्भात शेतकरी क्रांती मोर्चा जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचे रखडलेले विविध प्रश्न ९ ऑगस्ट क्रांती दिन स्व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव संघटनेच्या माध्यमातून मांडणार आहे २०२३-२०२४ चे  शासनाकडे ठिबक तुषार सिंचन चे ३२ हजार ४०२ शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार संच बसवले.[ads id="ads1"] 

  परंतु आज तागायत शेतकऱ्यांना १८८ कोटी रुपये या अनुदानाचा सबसिडीचा लाभ मिळालेला नसून शेतकरी वाऱ्यावर दिसून येत आहेत तसेच या सबसिडीचा लाभ त्वरित देण्यात यावा,जळगाव जिल्ह्यात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पिक विमा पूर्णपणे मिळवून द्यावा व शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम लवकर अदा करण्यात यावी,शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी,जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या व फेब्रुवारी मध्ये झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी,गारपीट चे थकीत अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर तात्काळ स्वरूपात जमा करण्यात यावी,

यासाठी  जळगाव येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा शेतकरी क्रांती मोर्चा धडकणार असून जिल्ह्यातील शेतकरी  बंधू तसेच शेतकरी संघटना जिल्हाधिकारी जळगाव तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात येणार आहे,शेतकरी संघटना ९ ऑगस्ट रोजी शुक्रवार सकाळी ११ वाजता जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते स्टेट बँक बस स्टॅन्ड मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोर्चा घेऊन जिल्हाधिकारीसो ,कृषी अधीक्षक जळगाव यांना निवेदन देणार आहेत.[ads id="ads2"] 

यासंदर्भात पोलीस स्टेशन पारोळा याद्वारे पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हाधिकारी जळगाव तसेच जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव याबाबतीत निवेदन दिले यावेळी स्व.शरद जोशी,प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील , तालुकाध्यक्ष प्राध्यापक, भिकनराव पाटील, सचिव गुलाबराव पाटील छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, संघटक गुलाब वाघ सरपंच नरसिंग पाटील काशिनाथ पाटील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी पारोळा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल महेश पाटील यांना निवेदन दिले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️