नवमतदारांनी मतदार नोंदणी करुन लोकशाही बळकट करा- तहसिलदार बी ए कापसे यांचे आवाहन

 


ऐनपूर महाविद्यालयात शासनाचा विद्यार्थी संवाद यात्रा कार्यक्रम संपन्न

ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल 

ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात रावेर तालुक्यातील तहसीलदार बी ए कापसे यांनी नवीन मतदारांना फार्म नं ६ चे वाटप केले.वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे सर्व नवीन मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदणी करावी. सर्वांनी मतदान केले पाहिजे व भारतीय लोकशाही बळकट केली पाहिजे असे आवाहन रावेर चे तहसिलदार यांनी विद्यार्थ्यांना केले. [ads id="ads1"] 

  तसेच ई-पीक पाहणी हे महाराष्ट्र शासनाचे ॲप डाऊनलोड करून आपल्या पिकांची नोंदणी करावी.असे मार्गदर्शन त्यांनी केले.प्रत्यक्ष शेतात जाऊन विद्यार्थ्यांना ई-पीकपाहणीचा डेमो करून दाखविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी सांगितले की महाविद्यालयातील नवीन मतदारांची नोंदणी १००% करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांना त्यांच्या पीकांची नोंदणी करुन द्यावयाची आहे. एका मोबाईल मधून दोनशे शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल.[ads id="ads2"] 

   ज्या शेतकऱ्यांना नोंदणी करता येत नाही अश्या शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांनी मदत करावी असे सांगितले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी तथा मतदार जनजागृती नोडल अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी मानले.कार्यक्रमाला मंडळ अधिकारी. श्री. जी. एन. शेळकर, ऐनपूर गावाचे तलाठी शरद सुर्यवंशी, धामोडी गावाचे चे तलाठी शाम तिवाडे,कोतवाल नयाना अवसरमल, पत्रकार अनिल आसेकर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व ९८ विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️