जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त यावल शहरात भरली भव्य सांस्कृतिक यात्रा


ए.आ.विकास प्रकल्पकाचे शासकीय कार्यक्रमात न्याय विभागासह सर्वपक्षीय पदाधिकारी,समाजसेवकांची उपस्थिती

यावल ( सुरेश पाटील ) जिल्हास्तरीय यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे आयोजित शासकीय जागतिक आदिवासी गौरव दिनाचे सांस्कृतिक कार्यक्रमात न्याय विभागासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवकांची,आदिवासी समाजातील सर्वस्तरातील महिला,पुरुष,लहान अल्पवयीन बालक,तरुण मुला-मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे यावल शहराला भव्य असे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.[ads id="ads1"] 

         जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्काचे रक्षण आणि जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो हा कार्यक्रम पर्यावरण संरक्षणासारख्या जागतिक समस्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्थानिक लोक करत असलेल्या कामगिरी आणि योगदानांना देखील ओळखतो त्याचप्रमाणे त्यांची पारंपारिक सांस्कृतिक सामाजिक कार्याची कामाची ओळख सुद्धा जाणीव करून देत असतो हाच मुख्य उद्देश आणि ध्येय लक्षात घेऊन यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. [ads id="ads2"] 

      कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्वात प्रथम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विजय पवार यांनी आयोजित कार्यक्रमात जळगाव जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव आणि यावल येथील मा.न्यायाधीश आर.एस.जगताप साहेब, सरकारी वकील विक्रम शेळके यांचे व उपस्थित वकील मंडळीचे स्वागत केले.जिल्हा विधी सेवा समितीचे सदस्य सचिव सय्यद तसेच यावल येथील सरकारी वकील विक्रम शेळके यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय प्रणालीत त्यांना काय काय सुविधा मोफत मिळतात याबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते आदिवासींना दिले जातीचे दाखले 

जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व आणि निमित्त साधून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर प्रांताधिकारी काकडे, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते मागणी केलेल्या आदिवासी बांधवांना जातीचे व उत्पन्नाचे दाखले, संजय गांधी योजना लाभार्थी मंजूर प्रकरण मंजूर झाल्याचे पत्र,अधिवास प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी तडवी भिल्ल उत्सव समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रामुख्याने धनश्री टॉकीज मध्ये कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर आदिवासी बांधवांच्या पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमाची देखाव्यास भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️