पेसा भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आसेमं संघटनेने दिले फैजपुर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

          

  फैजपुर प्रतिनिधी (मुबारक तडवी) 

आदिवासी सेवा मंडळ संचलित आसेमं संघटनेच्या वतीने आदिवासी तडवी भिल विविध सामाजिक मागण्यांचे निवेदन फैजपुर उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बबबनराव काकडे  भाग फैजपुर यांना आदिवासी समाज हिताच्या विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"] 

   तसेच आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे तर्फे फैजपुर उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पदावर नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष कार्यतत्पर शिस्तबद्ध शिस्तप्रिय लोकप्रिय लोकसेवक अधिकारी बबनराव काकडे यांचा सत्कार संघटनेचे पदाधिकारी यांनी केला  तसेच आसेमं आदिवासी सेवा मंडळ महाराष्ट्र राज््य या सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक मागण्यांचे निवेदनही देण्यात आले या मागण्यांचा समावेश आहे.[ads id="ads2"] 

1) आदिवासी जातपडताळणी कार्यालय धुळ्यावरून जळगाव न आणता नंदुरबार येथेच ठेवण्यात यावे.किंवा यावल येथे सुरू करावे. 

2) नाशिक येथे 1 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पेसा भरती संबंधित उपोषण व आंदोलनाच्या मागण्या मान्य कराव्या,  सदर उपोषणाला आमच्या संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. व पेसा भरती व पेसा अंतर्गत विविध उपाययोजना सुरू कराव्यात. 

3) आपल्या प्रांत कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आदिवासी अनु. जमातीच्या जातीच्या दाखल्यांचे वितरण लवकर करावे.

4) TRTI पुणे आदिवासी संशोधन आयुक्त मा. डॉ. राजेंद्र भारूड साहेब यांची तेथुन बदली करू नये.. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा अवलंबिला  जाईल. यासंबंधी आपण आमची मागणी शासन स्तरावर पोहचवावी. 

5) एका.आदिवासी विकास प्रकल्प यावल कार्यालयाच्या आवारात भगवान बिरसा मुंडा व क्रांतिकारी तंट्या मामा भिल यांचे पूर्णाकृती पुतळे उभे करावेत.

       अशा मागण्यांचा विचार होऊन आदिवासी हित जोपासावे हि आग्रहाची विनंती...


प्रत रवाना:-

१) मा.ना. राज्यपाल सो. महोदय महा. राज्य

२) मा.ना. मुख्यमंत्री साहेब, महा. राज्य

३) मा.ना. आदिवासी विकास साहेब महा. राज्य

४) मा. आयुक्त व संचालक अनु. जमाती जातपडताळणी कार्यालय धुळे

५) मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा जळगांव.यांना उपरोक्त संदर्भातील  मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री बबनराव काकडे यांना दिले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️