यावल येथील खानदेश महिला विकास संस्थेचे स्वस्त धान्य दुकान क्र. ११० तीन महिन्यासाठी निलंबित

 

यावल ( सुरेश पाटील ) येथील बोरावल गेट जवळील खानदेश महिला विकास संस्थेचे स्वस्त धान्य दुकान क्र. ११०  दुकानाची अनामत रक्कम शंभर टक्के शासन जमा करून स्वस्त धान्य दुकान तीन महिन्यासाठी निलंबित करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी दिला. [ads id="ads1"] 

      दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी दिलेला आदेश बघितला असता आदेशात नमूद करण्यात आले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुका अध्यक्ष आकाश सतीश चोपडे यांच्या तक्रारीनुसार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अहवालानुसार यावल येथील खानदेश महिला विकास संस्था स्वस्त धान्य दुकानदार दुकान क्र.११० स्वस्त धान्य दुकानाचे अनामत रक्कम शंभर टक्के शासन जमा करून प्राधिकारपत्र आदेशाच्या दि. पासून ३ महिन्यासाठी निलंबित करण्यात येत आहे.[ads id="ads2"] 

       निलंबित करण्यात आलेले स्वस्त धान्य दुकान व सदर दुकानात तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आलेली इतर स्वस्त धान्य दुकाने शासन निर्णयान्वये नजीकच्या स्वस्त धान्य दुकानात तात्काळ जोडावे व त्याबाबतचा अहवाल तात्काळ या कार्यालयाकडे सादर करावा सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानदार अध्यक्ष खान्देश महिला विकास संस्था स्वस्त धान्य दुकानदार यांनी सदर स्वस्त धान्य दुकानातील उपरोक्त नमूद त्रुटी व धान्यातील धान्य कमी वाटप बाबत जबाब व तफावती बाबत तहसीलदार यावल यांनी विशेष पथक नेमून डीआय व इडीआय यांचा ताळमेळ घेऊन फेर चौकशी करून तसा अहवाल या आदेशापासून १५ दिवसाच्या आत जिल्हा पुरवठा कार्यालयात सादर करावा. 

           आदेशानुसार आरसीएमएस प्रणालीत आवश्यकतेनुसार बदल करून याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा आदेशाविरुद्ध उप आयुक्त पुरवठा शाखा नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे ३० दिवसाच्या आत पुनरीक्षण अर्ज दाखल करता येईल अशा न्यायालयाचा न्याय निवाडा या संबंधितांवर बंधनकारक राहील.

            स्वस्त धान्य दुकान निलंबित करण्याच्या आदेशाच्या प्रति संबंधित दुकानदार यांच्यासह नाशिक विभाग नाशिक पुरवठा शाखा उपआयुक्त, उपविभागीय अधिकारी फैजपूर, तहसीलदार यावल यांच्यासह संबंधितांकडे देण्यात आल्या आहेत.

      यावल तालुक्यातील काही रेशन दुकानदार पुरवठा विभागाच्या अटी शर्ती व नियमाची पायमल्ली करून आपल्या सोयीनुसार स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वितरण ग्राहकांना लाभार्थींना कॅश मेमो न देता वितरण करीत असल्याने अनेक ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे याची सुद्धा चौकशी यावल पुरवठा विभागाने केल्यास यावल तालुक्यात पुरवठा विभागात मोठा अनियमितपणा उघडकीस  आल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा बोलले जात आहे.

          यावल येथील स्वस्त धान्य दुकान संस्थेच्या नावावर मंजूर असले तरी मात्र दुकान चालक मालक महमूद पटेल हे सेल्समन म्हणून दुकानाचे काम करीत असताना सोयीनुसार आणि ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक देऊन जो तक्रार करेल त्याला स्वस्त धान्य देणे बंद करीत होते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आकाश चोपडे जुगल पाटील योगेश चौधरी भगवान कोळी यांनी वेळोवेळी यावल तहसीलदार व पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या त्यानुसार दुकानावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पुरवठा विभागाचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️