तडवी द गाईड, भुसावळ तर्फे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा


सालाबादप्रमाणे या वर्षी देखील आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या तडवी द गाईड, भुसावळ या सामाजिक आणि पर्यावरणीय संस्थेने जागतिक आदिवासी दिवस उत्साव पारंपरिक पद्धतीने साजरा केला.[ads id="ads1"] 

अध्यक्ष श्री संजय बुरहान तडवी यांनी सांगितले की रॅली मध्ये फटाके आणि बँड न वाजवता त्यात होणारा वायफळ खर्च टाळून समाजाच्या महीला पुरुष यांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा, आभूषणे परिधान करून आपली संस्कृती आणि चालीरीती दाखविली तसेच जून्या काळात बैलगाडीवरून जाणाऱ्या लग्न वरातीचा सजीव देखावा साकार केला तसेच मान्यवरांचे स्वागत सत्कार झाडांची रोपे देवून करण्यात आला..[ads id="ads2"] 

बाल कलाकार अरहान अशफाक, ईशल सलीम, अदनान सोनु, यशफिन वजीर, अनम आरिफ, अरसलान अश्फाक, सोफिया मुबारक आणि जिशान रिजवान तडवी यांनी भिल्लोरी भाषेतील गाण्यावर आदिवासी नृत्य सादर केले.

महिलांनी भिल्लोरी भाषेतील झुला गित, हळदीच्या दिवशी गायली जाणारी गोयसोयनी अशी लोकगीते सादर केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री खलील अमीर तडवी आणि मान्यवर फत्तू रमजान यांच्या हस्ते माल्यार्पण करून भुसावळ येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आदिवासी यांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या यावल शहरात सजीव देखाव्यासह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग आणि आदिवासीं तडवी भिल जमात उत्सव समिती कडून आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

उत्सव समिती, यावल तर्फे उत्कृष्ठ सजीव देखावा आणि पथसंचलन साठी तडवी द गाईड, भुसावळ संस्थेला गौरवित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खजिनदार हमजान पिरखा, रॅली प्रमुख तस्लिम रशीद तडवी, महीला गट प्रमुख आयेशा तडवी, हाफिझा तडवी, परवीन तडवी, इतबार तडवी, झुल्फिकार तडवी, राजू तडवी, मुबारक तडवी, किरण तडवी, याकूब तडवी, शब्बीर तडवी, आरिफ तडवी, हुसेन तडवी, सोनू तडवी, वजीर तडवी, जावेद तडवी, अमित तडवी, साहिल तडवी, रूबीना तडवी, जरीना तडवी, बाबू तडवी, अमिन तडवी आणि अश्फाक जरदार तडवी यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️