यावल - रावेर तालुक्यातील शेतमजूर,वीट भट्टी कामगार,गवळीयांच्या लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

 "देवा भाऊ की पाठशाला " उपक्रमाला       

     डॉ. कुंदन फेगडे यांनी दिली भेट

यावल  ( सुरेश पाटील ) यावल- रावेर तालुक्यातील शेतमजूर,वीटभट्टी कामगार,गवळी यांच्या लहान मुलांसाठी  " देवा भाऊ की पाठशाला " हा उपक्रम डॉ.कुंदन फेगडे यांनी सुरू करून मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

            शिक्षणाचे  पर्व,देवाभाऊ सेवा पर्व अंतर्गत "देवाभाऊ की पाठशाला" हा उपक्रम रावेर यावल तालुक्यातील जनजातीय क्षेत्रात राबविला जात आहे.[ads id="ads1"] 

परिसरातील स्थलांतरित शेत मजूर,विट भट्टी कामगार,गवळी तसेच जनजाती बांधवांचे लहान मुलं शिक्षणा पासून वंचित राहू नये म्हणून "देवाभाऊ कि पाठशाळा" हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे .

शिक्षणाची  गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रवासी शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिकविण्याचा  एक छोटासा प्रयत्न सुरु केला.[ads id="ads2"] 

    सदर प्रकल्पाची पाहणी डॉ.कुंदन फेगडे यांनी केली यावेळी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व उपयोगी वस्तूंचे वाटप केले व त्यांच्यातील शिक्षणासाठीचा लळा मनोमन सुखावून गेला. मुलांसोबत संवाद साधत असतांना डॉ.फेगडे म्हणाले भारताचे भविष्य उज्वल होत आहे याची जाणीव हा प्रकल्प पाहिल्यावर होते.मायबाप जनतेच्या हितासाठी झटण्याची ऊर्मी अश्या ठिकाणाहूनच मिळत असते अश्याच पद्धतीने मतदार संघातील अधिकाधीक विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावा यासाठी आपल्या सगळ्यांना पुढच्या काळात प्रचंड काम करावे लागणार आहे असा आशावाद त्यांचा माध्यमातुन व्यक्त केला यावेळी त्यांचासोबत पंकज महाजन,महेश गडे, राम शिंदे आदि उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️