चातगाव वनविभागात वन लागवड घोटाळा केल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पडवे निलंबित

 


भारतीय जनसंसद जिल्हाध्यक्ष खरवडे यांच्या तक्रारीची घेतली दखल

यावल ( सुरेश पाटील ) गडचिरोली जिल्ह्यात चातगाव येथील वन विभागात रोपवन लागवडीत मोठा घोटाळा झाल्याची माहिती मिळाल्याने अहमदनगर येथील भारतीय जन संसदेचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती,या तक्रारीची दखल घेत वनविभागाच्या वरिष्ठ स्तरावरून चातगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पाडवे यांना निलंबित करण्यात आले.[ads id="ads1"] 

  गडचिरोली वनवृत्त वनविभाग गडचिरोली अंतर्गत चातगाव वनपरिक्षेत्राचा समावेश आहे.या वनपरिक्षेत्रात मार्च २०२१ ते २०२४ पर्यंत करण्यात आलेली रोपवन लागवड,हेक्टरी मोजमाप,हेक्टरी लावण्यात आलेली झाडे आणि जगविलेली झाडे,प्रत्यक्ष लागवड न करता पैशाची उचल करणे असे अनेक आरोप ठेवत भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी तक्रार केली होती.प्रत्येक कामावर लावलेल्या मजुरांचे व्हाऊचर,मजुरांच्या सह्यांची खात्री करणे,मोजमाप पुस्तिका,प्रत्येक मजुराची प्रत्येक कामावरील बँक खाते पुस्तिका तपासून घेतल्यास हा घोळ स्पष्टपणे दिसणार असल्याचे त्यांनी वनमंत्री,वन सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते.[ads id="ads2"] 

  याशिवाय साहित्य खरेदी मधील कोटेशन,जीएसटीची बिले तपासण्याची मागणी केली होती. वनपरिक्षेत्र अधिकायांच्या निर्देशावरून वनरक्षक,वनपालांनी अनेक कामांवर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची चर्चा होती. याशिवाय चातगाव वनपरिक्षेत्रात अतिक्रमण,अवैध उत्खनन,वृक्षतोडही झाल्याचा संशय होता.दरम्यान,पडवे यांनी वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी,अशीही मागणी भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केली होती. दरम्यान मुख्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांनी या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्या मार्फत चौकशी केली.त्यात संजय पडवे दोषी आढळले. प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई केल्याचे रमेशकुमार यांनी सांगितले.

     भ्रष्ट वनपरीक्षेत्र अधिकारी संजय पडवे याच्या भ्रष्टाचाराची सविस्तर माहितीची कागद पत्रे मिळवून सतत पाठपुरावा करून भ्रष्टाचार विरोधात विरोधात यश मिळवले एवढेच नव्हे कोणत्याच राजकीय दबावाला बळी न पडता तसेच या प्रकरणात अधिक पाठपुरावा करून कारवाई करू नये यासाठी दहशत व लाच देण्याचा प्रयत्न करून पाहिला पण भारतीय जन संसद जिल्हाध्यक्ष खरवडे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रकरण तडीस नेले या बद्दल त्याचे भारतीय जनसंसदेचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन यांनी तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध राज्यातील जिल्हाध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️