यावल तालुक्यात वृद्ध महिलेचे चार चौकीचे जुने घर पडून घरगुती साहित्याचे अंदाजे दीड लाख रुपयाचे नुकसान

 


तलाठी, ग्रामसेवक मुख्यालयाच्या बाहेर मात्र कोतवाल्याने केली पाहणी

यावल  ( सुरेश पाटील ) यावल तालुक्यात सतत धार दमदार पाऊस सुरू असल्याने शनिवार दि. १० ऑगस्ट २०२४ चे रात्री तालुक्यातील यावल भुसावळ रोडवर असलेल्या निमगाव येथील सुमनबाई रमेश पाटील वय अंदाजे  ८० या वृद्ध महिलेचे मालकीचे चार चौकीचे असलेले जुने घर कोसळून घरातील जीवनावश्यक वस्तू, घरगुती साहित्य,टीव्ही इत्यादी वस्तूचे अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. [ads id="ads1"] 

         तालुक्यात अनेक तलाठी, ग्रामसेवक हे आपल्या मुख्यालयी राहत नसल्याने गावात एखाद्या वेळेस अप्रिय घटना घडल्यास ग्रामस्थांना किंवा कोतवाल यांना ग्रामसेवक, तलाठी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती द्यावी लागते.[ads id="ads2"] 

  याचप्रमाणे निमगाव येथील घडलेल्या घटनेची माहिती कोतवाल  ताराचंद कोळी यांने मोबाईल मध्ये छायाचित्र काढून संबंधित आपल्या तलाठ्याला मोबाईल वरून रवाना केल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.संबंधित मंडळ अधिकारी तलाठी, किंवा ग्रामसेवक घटनास्थळी केव्हा भेटतील आणि महसूल आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे केव्हा माहिती देतील याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️