"या" तारखेपर्यंतच शेतकऱ्यांना ई- पिक पाहणीची नोंद करून घेण्याचे जळगाव जिल्हा प्रशासनाचे आवाहन :ई-पिक पाहणी नसेल तर सरकारची मदत मिळणे अवघड


१ ऑगस्टपासून नोंदणी सुरु

  जळगाव ( राहुल डी गाढे  ) : आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई- पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. यंदा ई-पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विम्यापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई- पीक पाहणी बंधनकारक केली आहे. १ ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी अॅपद्वारे खरिपातील पिकांची नोंद करून घ्यावी. राज्य शासनाकडून २०२१ पासून ई- पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. [ads id="ads1"] 

  या माध्यमातून शेतकऱ्यांनी हंगामातील पिकांची नोंद अॅपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पहिल्या वर्षी योजनेस कमी प्रतिसाद मिळाला होता. परंतु, नंतरच्या दोन वर्षानंतर शेतकऱ्यांमध्ये जागृती झाल्यामुळे ई- पीक पाहणीला प्रतिसाद मिळत आहे. यंदा देखील ई-पीक पाहणीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. १ऑगस्टपासून शेतकऱ्यांना अॅपवर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे.[ads id="ads2"] 

शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा

      जिल्ह्यात १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.सरकारकडून विकसित करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी अॅपद्वारे शेतकरी शेतातील पिकांची नोंद करू शकतील. 

        यानंतर तलाठी व कृषी सहायकांच्या स्तरावर नोंदणी करता येईल. यासाठी १५ ऑक्टोंबर ही शेवटची तारीख असणार आहे.

ई-पीक पाहणीचे महत्व

  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात येते. परंतु, आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केलेली आहे. अशाच शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. तसेच विमा कंपन्यांकडून देखील ई- पीक पाहणीचा अहवालाद्वारे शेतकऱ्यांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येते. यामुळे शेतकरी पीक विम्याच्या मदतीसाठी पात्र असताना देखील ई-पीक पाहणी झालेली नसल्याने अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अपात्र ठरवण्यात येते.

   शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदणी करता येईल. नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ताबडतोब करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️