ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल जेष्ठ नागरिक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल 

सरदार वल्लभभाई पटेल ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि ज्ञानोपासक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ तसेच सार्वजनिक वाचनालय ऐनपुर यांची वार्षिक साधारण सभा दिनांक 24/ 8 /2024 रोजी सकाळी नऊ वाजता सार्वजनिक वाचनालय ऐनपुर येथे मंडळाचे अध्यक्ष श्री जगन्नाथ शामू पाटील व काशिनाथ श्यामू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.[ads id="ads1"] 

  सुरुवातीला दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून अध्यक्षांचे व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून गौरवण्यात आले प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन झाल्यावर मंडळाचे उपाध्यक्ष आर एच पाटील यांनी अहवाल तेरीज पत्र ऑडिट रिपोर्ट व अंदाजपत्रक वाचून दाखविले सचिव एस एस पाटील यांनी गत्तवर्षीच्या कार्यांचा थोडक्यात आढावा घेतला वयाची 71 वर्ष पूर्ण केलेले जेष्ठ सभासद श्री आर एस पाटील श्री आर के सोनार श्री डी बी चौधरी श्री एस एन पाटील श्री रामदास सीताराम महाजन बालवाडी श्री जगन्नाथ बारी श्रीमती विमल राजाराम महाजन यांचा मान्यवरांच्या हस्ते रुमाल टोपी गुलाबपुष्प शुभेच्छापत्र आणि महिलांना ब्लाउज पीस देऊन सत्कार करण्यात आला.[ads id="ads2"] 

   सर्व सभासदांचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे आरोग्य संपन्न दीर्घायुष्याचे जावो यासाठी प्रार्थना करण्यात आली इयत्ता दहावी इयत्ता बारावी विज्ञान तृतीय वर्ष कला विज्ञान संगणक परीक्षेत प्रथम क्रमांकावर आलेले गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणप्रेमी दानशूर दात्यांच्या एक वर्ष मुदत ठेवीवरील व्याज पारितोषिक म्हणून देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ऐनपुर परिसर  शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सभासद श्री भागवत विश्वनाथ पाटील हे अमेरिकेचा दौरा करून मायदेशी सुखरूप परतले त्यानिमित्ताने श्री जगन्नाथ शामू पाटील यांच्या हस्ते शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यातर्फे आरोग्य तपासणी शिबिर सप्टेंबर 24 मध्ये सरदार व कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथे नियोजित आहे त्याबाबत माहिती प्रिन्सिपल श्री अंजने सर यांनी दिली व शिबिराचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा अशी विनंती केली की एस एस पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एच पाटील यांनी केले आभार प्रदर्शन चहापान झाला व सभा संपन्न झाली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️