जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याकरीता कार्यमुक्त करण्यासाठी १ लाख ८० हजारांची लाच स्वीकारताना (Zilha Parishad Jalgaon) जिल्हा परिषदमधील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीकाला जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ केली.
नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) असं लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
याबाबत असं की, तक्रारदार हे लोकसेवक असून ते यावल येथील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्यांची स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक पदावर रावेर पंचायत समिती (Raver Panchayat Samiti) येथे बदली झाली होती. बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याकरीता कार्यमुक्त करण्यासाठी नरेंद्र खाचणे यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती.[ads id="ads2"]
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून बुधवार दि. २१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्विकारतांना नरेंद्र खाचणे यास रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एन. एन. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पो.ना. बाळू मराठे, पो.ना. सुनिल वानखेडे, पोकॉ राकेश दुसाणे, पोकों प्रणेश ठाकुर, पोना किशोर महाजन, पो. कॉ. प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.