एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिका-यांकडे आसेम संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन सादर


यावल  ( सुरेश पाटील )

आज यावल येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी अरुण पवार याची भेट घेऊन आसेमं आदिवासी सेवा मंडळ या सामाजिक संघटनेच्या वतीने समाजातील उपयुक्त विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. [ads id="ads1"] 

     आसेम संघटने तर्फे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी या करिता आपण स्वतःजिल्हाधिकारी साहेबांनकडे आदिवासींची मागणी होत असल्याबाबत प्रस्ताव सादर करणे.व पाठपुरावा करणेबाबत पेसा भरती व पेसा संबंधित विविध उपाययोजना आदिवासी साठी मोकळ्या कराव्या.कन्यादान योजनेच्या विविध अटी रद्द कराव्यात. उदाहरणार्थ किमान १० च जोडप्यांची मागणी,२ -४ जोडप्यांचे प्रस्ताव आले तरी त्यांना लाभ देण्यात यावा.आदिवासीच्या सर्व विभागात फक्त आदिवासींचीच नोकर भरती करावी, उदा. अल्पसंख्यांक व अल्पभाषीक शाळा, संस्था मध्ये मागासवर्गीयांची भरती केली जात नाही व कंपन्यांनातर मागासवर्गीय भरती नियम लागुच केलेला नाही. मग अशा धरतीवर आदिवासी आश्रम शाळा, होस्टेल,फॉरेस्ट, आदिवासी प्रकल्प कार्यालय ते सर्व आदिवासी संबंधित विभागांमध्ये फक्त आदिवासीच कर्मचारी भरती व बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा. [ads id="ads2"] 

  संबंधित पत्र व्यवहार आपण आपल्या कार्यालयामार्फत शासनस्तरी पाठवावा.नुक्लिअस बजेट अंतर्गत राहिलेले अनुदान त्वरीत वितरित करून राहिलेल्या अर्जाचा विचार करून त्यांची योग्य ती निवड करून लाभ देण्यात यावा.अनु. जमाती जातपडताळणी कार्यालय जळगांव ऐवजी यावल येथे सुरू करावे, अन्यथा नंदुरबार येथेच ठेवण्यास खऱ्या आदिवासींची मागणी आहे. त्यासंबंधी आपण आमची मागणी शासन स्तरावर करावी.

             आय.टी.आय. मधील दरमहा मिळणारा आदिवासी विद्यार्थ्यांनचा स्टायपेंड रू. ५००/- गेल्या २ वर्षापासून वितरीत केलेला नाही. व स्टायपेंड किमान रु.४०००/- करण्यात यावा जेणेकरून आदिवासी विद्यार्थी व्यवसायीक शिक्षणाकडे आकर्षित होईल.

शबरी घरकुल उदिष्ट कोटा वाढविण्यात यावा व नगरपालिका क्षेत्रातील आदिवासींना ही याचा लाभ देण्यात यावा.

आदिवासी गोरगरीबांना खावटी कर्ज योजना वाटप करावी.आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी.अन्यथा बेरोजगार भत्ता लागु करावा.आदिवासी सुवर्ण जयंती विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना माहिती शाळांकडुन किमान १५ ऑगस्ट पर्यंत मागवावी.

जेणेकरुन उशिरा प्रवेश किंवा शाळा बदल करणारे विद्यार्थी लाभापासुन वंचित राहणार नाही.आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारात भगवान बिरसा मुंडा व क्रांतीकारी तंट्या मामा भिल यांचे पूर्णाकृती पुतळे उभे करावेत.

                अशा मागण्यांचा विचार होऊन आदिवासी हित जोपासावे असे दिलेल्या निवेदनात नमूद करून संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती रवाना करण्यात आल्या.यावेळी यावेळी उपस्थितांमध्ये आसेमंचे संस्थापक अध्यक्ष राजु तडवी सर नसीम साहेब ट्रेझरी जळगाव महिला राज्य अध्यक्ष अलीशानबाई न्हावी मा.ग्रा.पं.

सदस्य,महिला लोकनियुक्त सरपंच अंजुम रमजान तडवी,रमजानदादा मोहरद,

कर्मचारी संघटना प्रदेश अध्यक्ष कामील तडवी कर्मचारी संघटना प्रदेश अध्यक्ष इरफान तडवी,राजु इभ्राहिम तडवी माजी विस्तार अधिकारी मुक्ताईनगर,अनिल गुरुजी कर्म.संघटनेचे उपाध्यक्ष मुबारक गुरुजी हाजी झिपरा जनाब मारुळ जिल्हाअध्यक्ष मुबारक(उर्फ)अलीखा तडवी,युवक जिल्हाअध्यक्ष बी.राज तडवी,जिल्हा उपाध्यक्ष वसीम तडवी तसेच आसेमं पो.पा.जिल्हा प्रभारी समीती जिल्हा प्रमुख पदी सर्वांनुमते रईस जाफर तडवी पो.पा.कुसुंबा खु।।  यांची निवड करण्यात आली.लवकरच जिल्ह्यातील आदिवासी पो.पा.ची निवड करुन जिल्हा कार्यकारिणी लवकरच जाहिर करणार;

 शहर प्रमुख नशीर तडवी मायकल तडवी,समशेर मिस्तरी,फैजपुर शहर अध्यक्ष रशीद बाबु तडवी तसेच माजी आसेमंचे माजी.सरपंच राजु तडवी,रावेर तालुका अध्यक्ष न्याजोद्दीन बाबु तडवी वेंडर विवरा,उपाध्यक्ष युसुफ तडवी चिनावल,संजु तडवी यावल तालुका अध्यक्ष उस्मान तडवी,उपाध्यक्ष शब्बीर तडवी,उपाध्यक्ष माजी यावल बाजार समिती सदस्य सत्तार तडवी,नशीरदादा तडवी विरावल,उपस्थित पदाधिकारी शब्बीर पटेल,नासीर भाई,यावल तालुक्याचे शि.सं.चे तालुका अध्यक्ष श्रीकांत मोटे सर हे उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️