याबाबत जब्बार शाह लाल शाह फकीर रा.फेकरी ता भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सदरहून महिला ही आपल्या गावातील महिलांसोबत नेहमी प्रमाणे शेतमजुरी साठी शेतात कामावर जात होत्या, आज रोजी सुद्धा त्या आपल्या गावातील महिलांसोबत शेतात कामाकरीता गेल्या होत्या. दुपारी त्यांचे काम संपल्यावर त्या घरी परत येताना गावातील शिंगाडी शिवारात शैलेंद्र सोपान पाटील यांनी केलेले शेत गट नंबर १५१ या शेतात त्यांच्या अंगावर वीज पडून त्या जागीच पडल्या असता त्यांना ऐनपुर (Ainpur Tal Raver Dist Jalgaon) येथे खासगी दवाखान्यात नेण्यात आले. [ads id="ads2"]
डॉक्टरांनी त्यांना मृत्यू झाल्या असल्याचे सांगितले. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेल्या इतर महिला त्यांच्यात चालत असतांना अंतर आल्यामुळे इतर महिला सुदैवाने बचावल्या. अन्यथा याच्यापेक्षा मोठे अनर्थ घडला असता. सदर याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशन (Nimbhora Police Station) मध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास निंभोरा पोलिस स्टेशन चे स.पो.निरिक्षक हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली रिजवान पिंजारी हे करीत आहे.