अमळनेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- धर्म हि संकल्पना हजारो वर्षां पासून चालत आली आहे , धर्म मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ असल्याने त्याचे अनुसरण करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगून माणसांना धार्मिक बनविण्यात धर्मगुरू यशस्वी झाले आहेत , धर्म माणसा माणसात प्रेम निर्माण करतो , धर्म माणसाचा इश्र्वराशी संवाद साधतो , तो मृत्यू नंतर आपल्याला स्वर्गात स्थान देतो असे गोंडस वाक्य वापरून धर्म माणसाला आपल्याकडं आकर्षित करत आला.[ads id="ads1"]
यात माणूस हजारो वर्षां पासून अडकत आला आहे . धर्म मानवतेची , प्रेमाची , शांततेची शिकवण देत असला तरी जगात सर्वात जास्त लोकांचा बळी धर्माने घेतले आहेत असे परखड मत प्रसिध्द साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .
अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे अमळनेर येथे १७ ऑगस्ट रोजी आयोजित ' सर्व धर्म परिषद ' मध्ये वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते .[ads id="ads2"]
जयसिंग वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की धर्म या संकल्पने पेक्षा मानवता श्रेष्ठ आहे , धर्मा धर्मात संघर्ष होतो तेंव्हा तो संघर्ष मानवतावादी लोक पुढाकार घेवून मिटवत आलेले आहेत . मानवतावाद जिवंत आहे म्हणून धर्म जिवंत आहे हे जर प्रत्येक धर्माने समजून घेतले तर जगात येक नवी क्रांती होवू शकते . ती क्रांती यशस्वी झाली तर वंशवाद , जातीयवाद , धर्मभेद गळून पडेल व मानविहत्या रोखण्यात , मानवाचे जीवन सुखमय करण्यात आपल्याला यश मिळेल . हजारो वर्षांपासून धर्म प्रेमाची शिकवण देत आला पण सर्वात जास्त हिंसा माणसाने धर्मा साठीच केलेली आहे . धार्मिक युध्ये वीस वीस वर्षे चालली आहेत व त्यात लाखो लोकांचे नाहक बळी गेलेले आहेत . भारतातही धर्माच्या नावावर लाखो लोक आपल्या प्राणास मुकले आहेत असेही वाघ यांनी स्पष्ट केले . जगातील प्रत्येक धर्माने महिलांना तुच्छ लेखले आहे , प्रत्येक धर्मात पुरुषसत्ताक व्यवस्था आहे , प्रत्येक धर्माचे संस्थापक पुरुष आहेत , सर्वधर्म परिषद घेण्याचे व धर्मा धर्मात सामंजस्य निर्माण करण्याचे काम धर्मगुरूंचे असताना महिला सर्वधर्म परिषद घेताहेत ही एक ऐतिहासिक व दिशादर्शक बाब आहे असेही वाघ यांनी स्पष्ट केले .
मंचावर साध्वी प्रमेदिता , भिख्खू नागसेन , मकसुदभाई बोहरा , केरसी करांजिया , संत बाबा धीरज सींघजी , मुफ्ती हरून नदवी, रेव्हरंड विशाल वळवी , वेदमूर्ती भागवतकार अमोल शुक्ल ई. मान्यवर होते .
मुफ्ती हरून नदवी यांनी अतिशय आवेशपूर्ण भाषण करून हिंदू मुस्लिम धर्म कसे एकच आहेत याचे विश्लेषण केले .
भदंत नागसेन यांनी बौद्ध धर्म आजच्या काळात कसा उपयुक्त आहे आहे याबद्दल माहिती सांगितली . अन्य धर्मगुरूंनी आपापल्या धर्माचे महत्व विषद केले .
नॅनो संशोधक तथा माजी प्राचार्य डॉ. एल. के. पाटील यांनी धर्माची शिकवण व मानवाचे प्रत्यक्ष आचरण कसे भिन्न आहे याचे सविस्तर वर्णन करून धर्मव्यवस्थेवर प्रखर टीका केली .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार तथा राष्ट्रीय. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली व मंचावरील धर्मगुरू तथा अन्य निमंत्रितांशी प्रत्यक्ष संवाद साधला .
डॉ. अपर्णा मुठे , सरोज भांडारकर , कांचन शहा , वसुंधरा लांडगे या महिलांच्या पुढाकाराने ही परिषद घेण्यात आल्याने त्यास आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले , अमळनेर पोलीस स्टेशन ने परिषदेच्या यशस्वीते करिता विशेष परिश्रम घेतले .