जीनियस किड्स अ प्री स्कुल व आदित्य इंग्लिश मेडीयम स्कुल,रावेर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

 



रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि.15/8/2024 रोजी जीनियस किड्स अ प्री स्कुल व आदित्य इंग्लिश मेडीयम स्कुल रावेर येथे स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ध्वजारोहण भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष श्री. पद्माकर भाऊ महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तदनंतर भारतमाता व सरस्वती मातेचे प्रतिमापूजन संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत झटकार सर व मुख्याध्यापिका सौ. सविता सावळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"] 

  त्यानंतर सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. इयत्ता नर्सरी ते  इयत्ता आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर ठेका धरत सर्वांग सुंदर कवायत सादर केली.तत्पूर्वी स्वातंत्र्य संग्रामात आपले सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सर्व शहीद,क्रांतिकारक, देशभक्त यांच्या सन्मानार्थ  मराठी, इंग्रजी,हिंदी या भाषेतून विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. याप्रसंगी शाळेचा संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. [ads id="ads2"] 

  स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी पालक वर्गाने सुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भाग्यश्री धनगर , कु.निकीता काळे मॅडम यांनी केले. आभार कु.मोना जांगीड मॅडम यांनी मानले .याप्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. खाऊ वाटपानंतर  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️