महसूल विभागातून अभिनंदनाचा वर्षाव
यावल ( सुरेश पाटील ) जळगाव जिल्ह्यातून यावल , भुसावल, पारोळा येथील टॉप मोस्ट उत्कृष्ट तहसीलदार म्हणून जिल्हा निवड समितीने निवड केल्याचे पत्र प्राप्त झाल्याने यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांचे जळगाव जिल्ह्यासह नाशिक विभाग महसूल विभागातर्फे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. [ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की निवड समितीचे पत्र बघितले असता जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, कुळ कायदा तहसीलदार तथा निवड समिती सदस्य विजय सूर्यवंशी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव गजेंद्र पाटोळे यांच्या निवड समितीचे पत्र बघितले असता त्यात टॉप मोस्ट उत्कृष्ट तहसीलदार म्हणून भुसावळ येथील श्रीमती नीता लबडे,यावल येथील तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझिरकर,पारोळा येथील तहसीलदार उल्हास देवरे यांच्यासह इतर काही तहसीलदारांची उत्कृष्ट तहसीलदार निवड करण्यात आल्याचे पत्र १५ ऑगस्ट २०२४ निमित्ताने देण्यात आले आहे. उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड झाल्याने सर्व अधिकाऱ्यांचे महसूल विभागातून अभिनंदन करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
जळगाव जिल्ह्यात निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुळ कायदा तहसीलदार तथा निवड समिती सदस्य विजय सूर्यवंशी,निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड केल्याची यादी बघितली असता यादीत अनुक्रमे भुसावळ तहसीलदार श्रीमती नीता लबडे,यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर,पारोळा तहसीलदार उल्हास देवरे यांची टॉपमोस्ट तहसीलदार महसूल अंतर्गत सर्व कामे उत्कृष्ट केल्याने निवड करण्यात आली आहे.
तर अमळनेर येथील तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी ई - रेकॉर्ड कामकाज,तसेच चाळीसगाव येथील तहसीलदार प्रशांत पाटील यांनी रोजगार हमी योजना कामकाज,बोदवड येथील तहसीलदार अनिल वाणी यांनी पुरवठा आधार शेडिंग कामकाज,पाचोरा येथील तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी अनोंदणीकृत नोंदी कामकाज, चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी नोंदणीकृत नोंदणी कामकाज,धरणगाव येथील तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी आधार शेडिंग अद्यावती करण्याचे कामकाज, रावेर येथील तहसीलदार बंडू कापसे यांनी पुरवठा आधार सिडिंग कामकाज, तसेच मुक्ताईनगर येथील गिरीश वखारे यांनी महसूल वसुली कामकाज चांगल्या प्रकारे केल्याने उत्कृष्ट तहसीलदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली.