रावेर येथून शेंगाव आणि बुलढाणा जाण्यासाठी बसेस सुरु करावी - मनसेची आगार प्रमुखाकडे निवेदनाद्वारे मागणी

 


रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर  येथून शेंगाव आणि बुलढाणा बसेस सुरु करण्यात याव्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख संदिपसिंह राजपूत यांनी जळगांव विभागाचे डि.सी जगनोर l हे रावेर आगार विभागाला भेट देऊन प्रवाशी आणि कर्मचारीचे तक्रार सोडवण्यासाठी रावेर ला आले होते यांना निवेदनाद्वारे मागणी  करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

  रावेर तालुक्यातील भाविक भक्तांची प्रवासाची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रावेर आगारप्रमुखांना चार पाच वर्षे अगोदर निवेदन देऊन बस सुरू केली होती परंतु रावेर-शेगाव ही पिंप्री नांदू मार्गे सुटणारी बस अचानक बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली असून रावेर शहर आणि ग्रामिण भागातून भावीक फार मोठ्या प्रमाणावर श्री संत गजानन महाराज शेंगाव येथे माऊलींच्या दर्शनासाठी जात असतात.[ads id="ads2"] 

   सर्व भाविक मंडळी हे आमच्याच आहे त्यांचे दुःख हेच आमचेचं दुःख ही भावना मनात ठेऊन त्यांना प्रवासाची अडचण होऊ नये आणि सुखरूप प्रवास व्हावा या शुध्द आणि प्रामाणिक हेतु डोळ्यासमोर ठेवून ही बससेवा पूर्वरत सुरु करावी तसेच रावेर ते बुलढाणा पर्यंत बस व्यवस्था नसल्याने पवाशांचे मराठवाडय़ात जाण्यासाठी हाल होतात हि पण अशी आमची मागणी रावेर ते बुलढाणा बस सुरु करावी हि बस सोडल्यास प्रवाशी संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख संदिपसिंह राजपूत तालुका उपाध्यक्ष अरुण चौधरी संजय नारखेडे स्वप्निल चौधरी योगेश चौधरी यांनी याबाबत लेखी निवेदन जिल्ह्याचे डि.सी व आगारप्रमुखांना  दिले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️