सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- जळगाव येथील एकरा ए.जे.थीम कॉलेजच्या हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना तर्फे २८ जुलै रोजी जशने अलविदा कार्यक्रम थाटात संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी होते.दीप प्रज्वलन डॉ. अब्दुल करीम सालार सह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सदर शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एमए गफार एकरा सोसायटीचे सेक्रेटरी एजाज मलिक,शिक्षण विस्तार अधिकारी फिरोज पठाण,खलील शेख, नईम शेख,शरिया संस्थेचे अध्यक्ष व संघटनेचे विभागीय सचिव गौस खान,मुजीब शेख,आसिफ खान, असलम खान,जावेद अख्तर, इफ्ताखार शेख उपस्थित होते. जशने अलविदा कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस,विभागीय सदस्य सय्यद अफजाल,रावेर येथील शेख रईस न्याजमोहम्मद तसेच जिल्ह्यातील जवळपास ७० शिक्षकांना परशस्तीपत्र,शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान पुर्वक निरोप देण्यात आला.या ठिकाणी मान्यवरांचा देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाले.[ads id="ads1"]
प्रस्ताविक जावेद अख्तर शेख हबीब अमळनेर तर नात पठण रईस खान यांनी नातं पठण केले.निरोपआर्थि शिक्षका संबंधी रावेर विधानसभा आमदार शिरीष मधुकरराव चौधरी,संघटनेचे राज्य अध्यक्ष एम ए गफफार,डॉ.अ. करिम सालार,एजाज मलिक,गौस खान,फिरोज पठाण, खालील शेख,नईम शेख, इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.[ads id="ads2"]
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रईस खान शेंदुर्णी जावेद अख्तर अमळनेर,आसिफ खान जामनेर , मुजीबुरहमान शेख जामनेर , खान अफशा मॅडम भुसावळ व संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन साबीर मुस्तफा आबादी तर आभार अस्लम जनाब सावदा यांनी मानले.