आश्रमशाळेत थेट प्रवेश करत बिबट्याने केले बालकाला ठार : नंदुरबार मधील घटना


नंदुरबार (प्रतिनीधी ) : आश्रमशाळा आवारात घुसलेल्या बिबट्याने आठवर्षीय बालकाला उचलून नेत त्याला गंभीर जखमी करून ठार केल्याची घटना लोय ता.नंदुरबार Loy Taluka Nandurbar) ) येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेत घडली.

या थरारक घटनेमुळे आश्रमशाळा प्रशासन आणि वनविभागाविषयी प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मनोहर कालूसिंग वसावे (आठ वर्षे, रा. कोठली, पो. मोरंबा, ता. अक्कलकुवा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.[ads id="ads1"] 

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील लोय येथे आदिवासी प्रकल्प विभागाची शासकीय प्राथमिक आश्रमशाळा आहे. आश्रमशाळेचा आवार मोठा असून, गावलगच्या शेतांना लागूनच शाळेचा आवार आहे. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेनंतर मनोहर वसावे हा बालक लघवीसाठी उठला. बाहेरच आश्रमशाळा आवारात तो लघवी करीत असताना आश्रमशाळेच्या उघड्या गेटमधून बिबट्या आला असावा. बालकावर काही कळण्याच्या आत त्याने झडप घालत त्याला गंभीर जखमी करून ठार केले. मुलांना ओरडण्याचा आवाज आल्यावर शाळा आवारात पाहणी केली असता भयानक दृश्य दिसले. बालकाला लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.[ads id="ads2"] 

मिळालेल्या माहितीनुसार आश्रमशाळेला अनेक दिवसांपासून सुरक्षा रक्षकच नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय बुधवारच्या रात्री मुख्य प्रवेशद्वार उघडे होते. आश्रमशाळेच्या आजूबाजूला मोठे भिंतीचे कुंपण आहे. त्यातून बिबट्या आत येऊ शकत नाही. उघड्या प्रवेशद्वारातूनच आला असावा असे बोलले जात आहे.

दरम्यान, वनविभागाने या भागात पहाणी केली असता बिबट्या आणि तरसाच्या पावलांचे ठसे आढळून आल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे मात्र आश्रमशाळा प्रशासन आणि वनविभागाच्या गलथान कारभारामुळे संताप व्यक्त होत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️