त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi)हा पक्ष सुद्धा मागे नाही. अशातच दिनांक 14 ऑगस्ट रोजी भारतीय निवडणूक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलिंडर' चिन्ह दिल्याचे घोषित केले. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या सर्वच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने 'गॅस सिलिंडर' चिन्हावर निवडणूक लढवली होती.[ads id="ads2"]
विधासभा निवडणुकीत काही ठिकाणी कपबशी, तर काही ठिकाणी गॅस सिलिंडर अशा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, तर यंदा वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरा करत विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.
Election Commission of India has allotted Gas Cylinder to Vanchit Bahujan Aaghadi in all the Assembly Constituencies of Maharashtra for the upcoming Vidhan Sabha elections.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) August 16, 2024
Vanchit Bahujan Aaghadi Vijay Aso 💪🏻✊🏻#VoteForVBA #VoteForGasCylinder pic.twitter.com/RzetglXEpy