बबनराव काकडे यांची फैजपूरच्या प्रांताधिकारीपदी नियुक्ती

 

बबनराव काकडे यांची फैजपूरच्या प्रांताधिकारीपदी नियुक्ती

फैजपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : फैजपूरच्या प्रांताधिकारीपदी (Sub Divisional Officer) उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी बबनराव काकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.[ads id="ads1"] 

फैजपूरच्या उपविभागीय अधिकारी (Faizpur Sub Divisional Officer) तथा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी देवयानी यादव या त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण करून उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कॅडरमध्ये गेल्याने हे पद रिक्त होते. या ठिकाणी नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत संपूर्ण जिल्हा भरात उत्सुकता होती. अखेर या पदावर बबनराव काकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून महसूल व वन खात्याचे उपसचिव महेश वरूडकर यांनी याबाबतचे तसे आदेश निर्गमीत केले आहेत.[ads id="ads2"] 

बबनराव काकडे (Babanrao Kakde) उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी असून त्यांनी याआधी रावेरचे तहसीलदार (Raver Tahsildar) म्हणून तीन वर्षे यशस्वीपणे कारभार पाहिला आहे. कर्तव्यदक्ष व संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️