अनुसूचित जमातीतील उमेदवारांना रावेर येथे मोफत प्रशिक्षण


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर जि. जळगांव या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परिक्षांच्या पुर्वतयारी करीता दिनांक 01 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर, 2024 असे एकुण 3 महिने 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. प्रवेश मिळविण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.[ads id="ads1"] 

प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांकडुन विविध शासकीय/ निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा परिक्षांची पूर्वतयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना उपस्थितीनुसार दरमहा 10 हजार विद्यावेतन व प्रशिक्षण पुर्ण केल्यावर चार पुस्तकांचा मोफत संच व प्रमाणपत्र देण्यात येते. [ads id="ads2"] 

प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता मुलाखत दिनांक 30 जुलै, रोजी सकाळी ठीक 10 वाजता आहे. असून

उमेदवारांना प्रवेशासाठी उमेदवार हा अनुसूचित जमातीचा असावा. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवार हा कमीत कमी शालांत परिक्षा 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवार हा वयाचे १८ वर्ष पुर्ण असावा. व मुलाखतीच्य दिवशी  शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी, 12 वी, पदवी (सर्व शैक्षणिक पात्रता) गुणपत्रिका, आधार कार्ड, बैंक पासबूक, दोन पासपोर्ट साईज फोटो, अनुसुचित जमातीचा जातीचा दाखला या कागदपत्रांच्या मुळ व झेरॉक्स प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित रहावे.

अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. २, शनि मंदीरा मागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर किंवा संपर्कासाठी दुरध्वनी क्र. ०२५८४-२५१९०६ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर, जि. जळगाव यांनी केले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️