झाडांमुळे पर्यावरण संवर्धन व हवा शुद्ध राहते - डॉ गिरीश नारखेडे
साळवे (धरणगाव):-
साळवे ता धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालय साळवे येथे हरित सेने अंतर्गत वृक्षारोपण करतांना ग्रामसुधारण मंडळ साळवे चे चेअरमन डॉ गिरीश नारखेडे म्हणाले झाडांमुळे पर्यावरण संतुलित राहते व हवा शुद्ध होऊन सजीवांच्या पोषणासाठी फायदा होतो. याप्रसंगी खजिनदार डॉ चंद्रकांत नारखेडे , मुख्याध्यापक श्री एस डी मोरेसर , शिक्षक जी व्ही नारखेडे, एस पी तायडे, व्ही के मोरे, ए वाय शिंगाणे , बी आर बोरोले,शिक्षिका नीता पाटील, रंजना नेहेते, गुणवंती पाटील,प्रतिभा पाटील,जयश्री कोल्हे , कांचन अत्तरदे, सा. व. विभाग धरणगाव चे वनमजुर विलास मराठे, भारत गँस एजन्सी तर्फे श्री महेश रडे, विद्यार्थी व विद्यार्थिनी आदींनी व्रुक्षदिंडी काढून पर्यावरण पूरक घोषणा देऊन गावात जनजाग्रुती केली. [ads id="ads1"]
झाडे लावा... झाडे जगवा...पर्यावरण वाचवा. अशा घोषणांनी परिसरात वातावरण निर्मिती झाली. विद्यार्थ्यांना रोपवाटिकेतर्फे रोपांचे वाटप करून आपल्याला परिसरात मोकळ्या जागेत 'एक पेड मा के नाम' या उपक्रमांतर्गत जबाबदारी सोपवण्यात आली. विद्यार्थ्यांनी ती आनंदाने स्विकारली. [ads id="ads2"]
सार्वजनिक वनविभागाचे वनमजूर विलास मराठे यांनी शिसम,सांजरी,निंब, सीताफळ आदी रोपट्यांचे वाटप केले व झाडांचे महत्त्व पटवून दिले. हरित सेना प्रमुख सौ आर पी नेहेते व श्री ए वाय शिंगाणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले.