राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करणेबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जळगाव आणि त्या सलग्न सर्व कास्ट्राईब कर्मचारी संघटनामार्फत दि. १३ ऑगस्ट रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन




जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसह इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती सरळसेवा भरतीमध्ये दिलेल्या सवलतीस अनूसरून मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय व मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी करणे बाबत देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिव यांना केंद्रसरकारने परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीसह मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती रोखता येणार नाहीत. असे स्पष्ट निर्देश देऊनही राज्यातील महायुती सरकारने अद्यापही मागासवर्गीयांच्या पदोन्नती बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे कस्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभर १३ आगस्ट 2024 रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत, जळगाव कस्ट्राईब कर्मचारी महासंघ व त्यास संलग्न सर्व शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना कस्ट्राईब महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अनिल डी गाढे, जिल्हा उपाध्यक्ष बी. एस पाटील,भूमी अभिलेख, आनंदकुमार मानकर उपाध्यक्ष कोषागार, कार्तिक दोंदे,कस्ट्राईब मनपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार गायकवाड, कस्ट्राईब जलसंपदा पाटबंधारे विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, जिल्हा सचिव जीभाऊ हटकर, कोषाध्यक्ष सचिन वंजारी, संघटक अजय बोरसे, दगडू जोशी,इ. पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️