फुले , आंबेडकर यांचा संघर्ष हाच आपला आदर्श : जयसिंग वाघ

 

मोहा फाटा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील समस्त जनतेच्या कल्याणार्थ जी लढाई लढली आहे ती परकीय शक्तीच्या विरोधात लढल्या गेलेल्या लढाई पेक्षा अधिक संघर्षमय राहिलेली आहे . या महापुरुषांना परकियां सोबतसोबतच स्वकीयां विरुद्ध एकाच वेळी लढाई लढावी लागली या करिता फुलेंना सामाजिक बहिष्कार सहन करावा लागला तर बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून , जातीयतेचे चटके सहन करावे लागले , त्यांच्या त्या संघर्षामुळेच आज अनाथ , निराधार , भटके , आदिवासी तसेच कोणत्याही प्रकारची साधने नसणारे , डोंगर कपारीत राहणारी मुलं शिक्षण घेत आहेत व आपला सर्वांगीण विकास करून स्वाभिमानाचे जिणे जगत आहे. म्हणूनच फुले , आंबेडकरांचा संघर्ष हाच आपला आदर्श आहे हे आपण मानावे असे आग्रही प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.[ads id="ads1"] 

      मोहा फाटा तालुका जामखेड येथील निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते .  जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की सर्व समस्यांचे निवारण आपण शिक्षणातून करू शकतो , बाबासाहेबांनी शिक्षणास वाघिणीचे दूध संबोधले आहे . वाटेल ते कष्ट करा , उपाशी रहा पण शिक्षण घ्या हा संदेश त्यांनी आपणास दिला आहे .

        पोलीस उपनिरीक्षक गौतम तायडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपण  आपले शिक्षण पूर्ण करून कितीही मोठ्या हुद्यावर नोकरीला लागले तरी आपला आजचा संघर्ष विसरू नये , पुढील आपल्या सारख्याच विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे या करिता आपण प्रयत्नशील असेल पाहिजे तरच तरच आपल्या प्रगतीचा गाडा पुढं जाईल असे विचार व्यक्त केले .[ads id="ads2"] 

          या निवारा बालगृहात अनाथ , अत्याचारग्रस्त , निराधार , लोककलावंत , वंचित , भटके समाजातील मुलं असतात , आज अशी ७० मुलं , मुली आहेत . भटक्या समाजातील लढाऊ नेते डॉ. अरुण जाधव यांनी २०१५मध्ये या केंद्राची स्थापना केली आहे आज हे केंद्र एक आदर्श केंद्र ठरले असून यातील बरीच मुलं मोठ्या पदावर नोकरी करीत आहेत अशी माहिती संस्थेचे समन्वयक संतोष चव्हाण यांनी दिली .

         संचालक बापू ओहोळ यांनी सूत्रसंचालन , तुकाराम शिंदे यांनी प्रास्ताविक , सुरेखा चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले . 

        या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मैत्रेय तायडे यांनी या कलाकारांना बक्षीस प्रदान केले .

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️