२६ जुलै रोजी पारोळा तालुक्यात रत्नापिंपरी शिवधाम फाट्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन

 


यावल / पारोळा( सुरेश पाटील ) शुक्रवार दि. २६ जुलै २०२४ रोजी पारोळा तालुक्यात रत्नापिंपरी शिवधाम फाट्यावर स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पारोळा DC कडून निवेदन देण्यात आले आहे.

      दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षाच्या उर्वरित पीक विमा, अवकाळी पाऊस व गारपीटी नुकसान झालेले पिकांची नुकसान भरपाई मिळावी.[ads id="ads1"] 

            मागील वर्षी 2023 खरीप व रब्बी तसेच 2024 फेब्रुवारी मध्य खरीप रब्बी हंगामात अवकाळी पाऊस गारपीट तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना मात्र शासन स्तरावरून कानाडोळा होताना दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून न्याय मिळण्याची मागणी केलेली आहे, मागील वर्षी हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस गारपीट हवेचा वेग अतिवृष्टी अशा कारणांनी शेतकऱ्यांना वेढले होते,अद्याप शासन प्रशासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेला नसून तसेच उर्वरित पिक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने शुक्रवार दि.२६ रोजी शुक्रवार ११ वाजता पारोळा तालुक्यातील रत्नापिंपरी येथील शिवधाम फाट्यावर.आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.        असे आशयाचे निवेदन पारोळा तहसीलदार तसेच पारोळा कृषी विभाग पारोळा पोलीस स्टेशन पिक विमा प्रतिनिधी यांना देण्यात आले आहे तरी निवेदनाची दखल संबंधित घेणार किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads2"] 

     निवेदन देतेवेळी स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील,तालुकाध्यक्ष प्रा.भिकनराव पाटील सर,अमळनेरचे शिवाजी पाटील,सुनील पाटील,अनिल पाटील,वाल्मीक पाटील, गुलाबराव पाटील यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️