यावल येथील श्री महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भरगच्च कार्यक्रम

 


यावल  ( सुरेश पाटील )

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या आशीर्वादाने धन,सुख,शांती आणि समृद्धीचे वरदान मिळू शकते,असे ज्योतिषी सांगतात.या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.गुरूचे स्थान श्रेष्ठ असे मानले जाते.[ads id="ads1"] 

    आणि आजही आजच्या अत्याधुनिक युगात सर्व क्षेत्रातील वरिष्ठ गुरुवर्य मंडळींचे ( विविध धर्माचे संत,महंत शासकीय निमशासकीय कार्यालयातील ज्येष्ठ अधिकारी किंवा खाजगी क्षेत्रातील मालक आणि मार्गदर्शक ) महत्व कमी झालेले नाही हे सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञात असून मान्य करावे लागेल, आपल्या वरिष्ठांच्या नॉलेज, ज्ञानाचा आदर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश वजा सूचना म्हणून आपले दैनंदिन कामकाज सुरू आहे.[ads id="ads2"] 

           गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यात साजरा केला जातो.शास्त्रानुसार या दिवशी स्नान,दान आणि गुरुची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.तसेच स्नान करून जगाचे रक्षक भगवान विष्णू आणि गुरु यांची पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.तसेच जीवनातील अंधार दूर होतो. अशी आख्यायिका आहे. 

              याचे महत्व लक्षात घेता यावल येथील श्री व्यास व श्रीराम मंदिर संस्थान तर्फे श्री व्यास पौर्णिमा उत्सव सालाबाद प्रमाणे श्री व्यास मंदिरात रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी महापूजा व दुग्धाभिषेक आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी भाविकांनी नागरिकांनी श्री व्यास पौर्णिमा उत्सव व महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री व्यास व श्रीराम मंदिर संस्थान सुधार समितीतर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️