पाल येथे तीनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम

 


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरसालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पाल व परिसरातील दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या तीनशे शालेय विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनंजय चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी जैन इरिगेशन सिस्टीमचे  देवेंद्र पाटील,  जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले यांची उपस्थिती होती.[ads id="ads1"] 

*विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याचा सदुपयोग करावा - धनंजय चौधरी*

पत्रकारीता हा आपल्या देशातील लोकशाही चा चौथा स्तंभ मानला जातो पत्रकार नेहमीच समाजाला आरसा दाखवून ज्वलंत प्रश्न मांडत असतो, पत्रकार संघ पत्रकारिते सोबत शैक्षणिक मदत पोहचवून मोठी समाजसेवा करत असून स्तुत्यपुर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं पत्रकार सुद्धा समाजातला एक महत्वपूर्ण घटक असल्यामुळे त्यांच्या समस्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असून त्या गांभिर्याने घेतल्या गेल्या पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

*विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणं आमचं कर्तव्य समजतो - प्रविण सपकाळे*

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांच्या गरजू पाल्याना व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो, पत्रकार संघ उपक्रमशील असून पत्रकार व समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करत आहे येणाऱ्या काळातही लोकसहभागातून 'शैक्षणिक चळवळ' व्यापक करणार असल्याचं प्रविण सपकाळे यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं.

या उपक्रमासाठी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांच्यातर्फे वह्या उपलब्ध करून दिल्या तर रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट जळगाव व अन्य दात्यांनी दप्तर व इतर साहित्य उपलब्ध करून देत विशेष सहकार्य केले.[ads id="ads2"] 

कार्यक्रमाच्या सुरवातीला पत्रकार संघांचे जिल्हाउपाध्यक्ष सुरेश पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण महाजन यांनी तर आभार मनीष चव्हाण यांनी मांडले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्याध्यक्ष योगेश सैतवाल,धीरज नेहेते, पत्रकार संघांचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष रवी महाजन, मनोज चौधरी, नसीम तडवी, संजय पवार,भुषण सोनवणे,पुष्कर फेगडे,.मनोज चौधरी,कैलास लवंगडे,गणेश भोई,मगन पवार,सद्दाम पिंजारी, इकबाल पिंजारी,सुमित पाटील यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️