यावल ( सुरेश पाटील ) संपूर्ण यावल शहराचे नाक असलेल्या फालकनगरमधे दर्शनी भागातील गटारीचा, आणि रस्त्याचा कसा बोजबारा वाजला आहे आणि त्याचा नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत लागत आहे आणि यावल शहरातील अनेक भागात स्वच्छता व आरोग्य विभाग अभियंता यांचे कामकाज कसे चालले आहे हे दिसून येत असून त्याचा हा घ्या बोलका आणि स्पष्ट पुरावा.[ads id="ads1"]
यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात भुसावल रोडवर फालकनगर एस.टी.बस स्टॉप जवळील भागात म्हणजे सद्गुरु ऑटो पासून पत्रकार डी.बी.पाटील यांच्या घरापर्यंतच्या व आजूबाजूच्या परिसरात गटारीची,आणि रस्त्याची किती व कशी दयनीय अवस्था झाली आहे आणि रहिवाशांना किती त्रास सहन करावा लागत आहे याकडे मात्र पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता व आरोग्य विभाग प्रमुख यांचे दुर्लक्ष होत असल्याने संपूर्ण फालकनगर मध्ये यावल नगरपालिका कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
यावल नगरपरिषद पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता आरोग्य विभाग प्रमुख यांच्या व बांधकाम विभाग अभियंता यांच्या काही ठराविक ठिकाणचे चांगल्या केलेल्या कामाचे छायाचित्र आणि व्हिडिओ शूटिंग नगरपरिषदेच्या प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतात परंतु शहरातील अनेक ठिकाणी गटारीतील घाण पाणी गटारीतून वाहून जात नसल्याने त्याच ठिकाणी साचून राहत असल्याने नागरिकांना दुर्गंधी येत आहे. अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी गटारीवरील ढापे नादुरुस्त झालेले आहेत, सार्वजनिक खाजगी प्लॉट इत्यादी मोकळ्या जागांवर काटेरी झाडे झुडपे व घाणीचे साम्राज्य झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, रस्त्याचे बारा वाजले आहे,फालकनगर मधील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर फक्त अंदाजे दोनशे मीटर लांब इतका सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला त्यावेळेस यावल नगरपरिषदेने आणि बांधकाम विभाग अभियंत्याने रस्त्याच्या आजूबाजूची अतिक्रमण न काढता तसेच ठेकेदारामार्फत रस्त्याच्या दोन्ही टोकावर व्यवस्थित " लूप " न दिल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना नागरिकांना मोठा झटका बसून त्रास सहन करावा लागत असून या भागातील नागरिकांना कंबर दुखण्याचा त्रास सुरू झाला असून रस्त्याचे दोन्ही टोकावर दुचाकी वाहनधारकांचे कंबरर्डे मोडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.अशाप्रकारे बांधकाम विभागाचे सोयीनुसार काम सुरू आहे इत्यादी अनेक कामांकडे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी आपले लक्ष केंद्रित करून स्वच्छता व पाणीपुरवठा विभागात प्रत्यक्ष कागदपत्री किती कामगार / मजूर दाखविले आहेत आणि प्रत्यक्ष कामावर किती मजूर असतात,आणि कागदपत्रे दाखविलेल्या मजुरांच्या नावे पेमेंट कसे दिले जाते..? घनकचरा प्रकल्पात असलेली मशिनरी प्रत्यक्षात सुरू आहे की बंद..? प्रत्यक्षात ओला व सुका घनकचरा किती संकलन केल्याचे व त्यावर प्रक्रिया केल्याचे दाखवून प्रत्यक्षात किती कचऱ्यावर प्रक्रिया झाली..? आणि त्याची विल्हेवाट कशी लावली..? विज बिल प्रत्यक्षात किती भरले जात आहे याची चौकशी केल्यास मोठा घोळ,गैरप्रकार, आणि आर्थिक उधळपट्टी कशी झाली आहे आहे हे दिसून आल्याशिवाय राहणार नाही अशी संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.