आंतर राज्यीय गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद, 11 म्हैशीसह एकूण 16 लाख रु किं चा मुद्देमाल हस्तगत

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :  निंभोरा पोलीस स्टेशन ता. रावेर जि. जळगाव येथे दिनांक 24.04.2024 रोजी गु.र.न 69/2024 भा.द.वि कलम 379 प्रमाणे व दिनांक 10.06.2024 रोजी गु.र.न 108/2024 भा.द.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही गुन्ह्यातील एकुण 5 म्हैशी कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेले बाबतच्या तक्रारीवरुन गुन्हे तपासावर घेण्यात आले होते.

सदर गुन्हातील आरोपीचा शोध घेणे बाबत व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक सो श्री महेश्वर रेड्डी सर. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अशोक नखाते सर, मा. सहा. पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह मॅडम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते.[ads id="ads1"] 

   मा. वरीष्ठांच्या आदेशानुसार निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मा. सपोनि हरीदास बोचरे व तपासी अंमलदार पोहेका ज्ञानेश्वर चौधरी, पोना/अविनाश पाटील हे गुन्हाचा तपास योग्यरित्या करीत होते. दाखल गुन्हात सपोनि बोचरे यांनी केलेल्या तांत्रिक तपास व अमंलदार यांच्या मदतीने 60 पेक्षा अधिक सि.सि.टी.व्ही कॅमे-यांची पडताळणी केली असता सदरील आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच आरोपीतांपैकी आरोपी नामे 1) तुकाराम रुमालसिंह बारेला, रा. बोरी जि.ब-हाणपुर हा न्हावी, फैजपुर ता यावल येथे असल्याबाबत खात्रीशीर माहीती सपोनि हरिदास बोचरे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी लागलीच फैजपुर पो स्टे चे सपोनि / निलेश वाघ यांना सदरची माहीती देवुन त्यांच्या मदतीने त्यास ताब्यात घेतले होते.  [ads id="ads2"] 

  आरोपी तुकाराम याच्याकडे तपास केले असता इतर आरोपी मध्य प्रदेश राज्यात असले बाबत समजल्याने मा. पोलीस अधिक्षक सो यांच्या आदेशाने मा. सपोनि हरिदास बोचरे, पोहेकॉ/जाकीर पिंजारी, चापोहेकॉ योगेश चौधरी, पोना/सुरेश पवार व पोकों/मयुर निकम व रावेर पो स्टे चे पोहेकों/ईश्वर चव्हाण, पोकों/सचिन घुगे असे शोध पथक मध्यप्रदेश राज्यात जावुन आरोपी नामे 2) धर्मेंद्र दुरसिंग बारेला, रा. ढेरीया जि. खंडवा, 3) शांताराम बिल्लरसिंह बारेला, रा. हिवरा जि.ब-हाणपुर, 4) सुभाष प्रताप निंगवाल, रा. दहिनाला जि.ब-हाणपुर, 5) मस्तरीराम काशीराम बारेला, रा. न्हावी ता. रावेर यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन 11 म्हैशी, 2 बोलेरो पिकअप व 2 मोटार सायकल असे एकुण 16,00,000/- रु किं चे मुद्देमाल हस्तगत केले असुन त्यांची गुन्हाच्या अनषंगाने चौकशी केली असता त्यांनी निंभोरा पो स्टे येथील गु.र.न 69/2024, गु.र.न 108/2024, फैजपुर पो स्टे गु.र.न 97/2024, गु.र.न 137/2024, गु.र.न 151/2024 मुक्ताईनगर पो स्टे गु.र.न 05/2024, गु.र.न 57/2024, रावेर पो स्टे गु.र.न 298/2024, सिल्लोड ग्रामीण पो स्टे (जि. छत्रपती संभाजीनगर) गु.र.न 165/2024 व पंधाना पो स्टे गु.र.न 122/2024 (जि. खंडवा, राज्य मध्यप्रदेश) अशा ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

यातील आरोपी क्र.2) धर्मेंद्र दुरसिंग बारेला. रा. ढेरीया जि. खंडवा यावर विविध कायदे व कलमान्वये 14 गुन्हे मध्यप्रदेश राज्यात दाखल असुन तो पंधाना पोलीस स्टेशनचा जि. खंडवा येथील हिस्ट्रीशीटर आहे व मध्यप्रदेश राज्यातील ब-हाणपुर, खंडवा, खरगोन, हरदा या 4 जिल्हातुन तडीपार करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही निंभोरा पो स्टे प्रभारी अधिकारी मा. सपोनि हरीदास बोचरे, श्रेपोउपनि राजेंद्र पाटील, सफौ/ ज्ञानेश्वर पाटील, चासफो/अशरफ शेख, पोहेकॉ/स्वप्निल पाटील, पोना/सुरेश अढायगे, पोना/सुरेश पवार, पोकों/मयुर निकम, पोकों/किरण जाधव व पोकों/अमोल वाघ फैजपुर पो स्टे प्रभारी अधिकारी सपोनि निलेश वाघ, सफौ/विजय चौधरी, सफौ/देविदास सुरदास, पोहेकॉ राजेश ब-हाटे, पोहेकॉ महेंद्र महाजन, रावेर पो स्टे पोहेकॉ ईश्वर चव्हाण, पोका/सचिन घुगे, स्था.गु. शाखा जळगाव येथील पोना/ईश्वर पाटील, पोकों/मिलींद जाधव, पोकों/गौरव पाटील या तांत्रिक विश्लेषण पथकाने सि.सि.टी. व्ही फुटेज व इतर पुरावे गोळा करुन एकुण 10 गुन्हे उघडकीस आणले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️