विशेष लेख : "असत्याला आज आम्ही सत्य मानत आहोत.."

 


  मागील एक ते दोन दशकांमध्ये स्मार्टफोन आणि मोबाईल चा प्रत्येक माणसासाठी उपयोगाचा आहे. म्हणून तो घेतलाच पाहिजे अशी एक चांगली समज प्रत्येकाची बनलेली आहे. जगभरातल्या मनुष्यमात्राच्या हातात मोबाईलचे खेळणे आलेले आहे. त्याच्यासोबत सोशल मीडिया आणि कॅमेरा व असे बरेचसे ॲप हे त्यामध्ये आलेले आहेत. मोबाईल घेतल्यानंतर त्यामधून फोटो काढणे ही एक कला मानली जाते. पण फोटो काढण्यासाठी खरा उपयोग अगोदरच्या काळात कॅमेऱ्यामार्फत केला जायचा. त्यासाठी काही लोक विशिष्ट प्रशिक्षण घ्यायचे .पण आज मात्र जो तो उठतो आणि स्वतःचे छायाचित्र काढतो आणि लगेच सोशल मीडियावर टाकून देतो. का तर फक्त लाईक आणि कमेंट मिळविण्यासाठी ? त्यामध्ये सुद्धा चमचमाट आणि लखलखाट असेल तरच ते फोटो टाकतात. काही लोक तर यालाच सेल्फी असे पण म्हणतात.[ads id="ads1"] 

"मी दुनियेला नाही तर दुनियेने मला पहावे" असं प्रत्येक समाज माध्यमावर फोटो टाकणाराच मत असतं . 

सेल्फी चा इतिहास बघायचा झाला .तर 2002 मध्ये ऑस्ट्रेलियातील एक महाभाग मद्यधुंद अवस्थेत जिन्यावरून कोलमडताना त्याने स्वतःचेच छायाचित्र टिपले आणि त्या दुर्घटनेतूनच पहिल्या सेल्फीचा जन्म झाला. अशी एक डिजिटल कथा सांगितली जाते .त्यानंतर पुढे फ्रीकर नामक एका संकेतस्थळाने सेल्फी या विशेष संबोधनासह छायाचित्राचा स्वतंत्र विभाग सुरू केला. तेव्हापासून ही सेल्फी ही हवेपेक्षाही जास्त जोरात पसरत आहे.[ads id="ads2"] 

सेल्फीच्या नंतर आणखी एक पायरी आली ती म्हणजे रील बनविणे यामध्ये रील म्हणजेच लघु चित्रफीत यामध्ये आपणच नायक किंवा नायिका आणि खलनायकाचा काही प्रश्नच नाही म्हणजे थोडक्यात तो नसतोच. या रील च्या नादात तर कित्येक जन आपला जिव गमवत आहेत. मुंबईतील एक सुशिक्षित तरुणी कठड्यावरून कोसळून तिने स्वतःचा जीव गमावला. सेल्फी आणि रिल्स ची वेळ आता तर मानसिक विकृती आणि जीव घेण्या कृती करत आहे .याचंच दुसरे उदाहरण मुंबईत राहणारी सुखवस्तू घरातली चार्ट अकाउंटंट असलेली अन्वी कामदार ही मुलगी रील बनवण्याच्या नादात धबधब्या नजीक कठड्यावरून तीनशे फूट दरीत कोसळली. आता ही रील बनवण्यामागे तिच्या मनात काय विचार येत असतील.? आणि रील जर बनवली नसती तर कुणाचे काहीच नुकसान होणार नव्हते. ना कोणता पुरस्कार मिळणार होता.? फक्त लाईक आणि कमेंट्स व फॉलोवर याच्या करिता जर आम्ही आमचा जीव गमावत असु तर ही एक मानसिक विकृती म्हणायला हरकत नाही. कालपर्यंत काही गोष्टी ह्या फक्त सिनेमा तारक याकरिताच होत्या. ज्या आज सर्वसामान्यकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रत्येक जण आज स्वतःला एक उत्कृष्ट नट आणि एक उत्कृष्ट नटी असे समजत आहे. काही काही इंस्टाग्राम स्टार तर समाज माध्यमावर खूप गाजत आहेत.

 काही काही कार्यक्रमात त्यांना आमंत्रित केले जाते आणि या माध्यमातून त्यांना आर्थिक लाभ सुद्धा मिळतो.

आज अभासी जग हे वास्तव बनू लागले आहे. मागील काही दिवसांमध्ये बीडच्या एका तरुणाने भरधाव मोटरसायकल चालवत रील बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याने त्याचा स्वतःचा जीव गमावला.

 त्यानंतर संभाजीनगर येथील एक युवती रिव्हर्स मध्ये मोटर चालवत असताना खाईत पडली. ह्या वृत्तपत्रात आलेल्या घटना आहेत पण अशा किती घटना असतील ज्या आपणाला माहित सुद्धा नाहीयेत. ज्या लाखोच्या घरात जातील. आणि हे कामे करण्यासाठी बुद्धीचा वापर करण्याची गरज पडत नाही. हे काम करत असताना काही महत्त्व पण मिळत नाही. काही लोक जर सोडले तर यामधून निव्वळ आणि निव्वळ टाइमपास मिळतो. टाईमपास होतो आणि काही लोकांना अर्थ लाभ होतो तोच अर्थ लाभ हा सर्वांना होईल अशी एक खोटी समज निर्माण झाली आहे. व जो तो रिल्स काढण्याच्या नादात आपले प्राण गमावत आहे. आपला वेळ गमावत आहे. आपला नेटचा डेटा गमावत आहे. आणि यालाच आभासी जगाला वास्तविक जग समजत आहेत. यामध्ये महत्त्वाची आणखी एक गोष्ट मला एखांदी यामधून सुंदर युवती मिळेल किंवा युवक मिळेल अशी खोटी समज असते .समाज माध्यमावर आपले आभासी अस्तित्व वास्तवातील जगण्यापेक्षा अधिक आकर्षक का वाटत असेल ?

 हा एक नवा प्रश्न तयार झालेला आहे. लोक म्हणतात समाज माध्यमांमुळे जग जवळ आले आहे. पण खरंच जर विचार केला तर जग जवळ आले .पण ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणची माणसे स्वतःचे नातेवाईक हे दूर गेलेले आहेत. हे चित्र आज दिसत आहे. जवळ असलेल्या लोकांना आपण बोलत नाही आणि अभासी जगात असलेल्या लोकांसोबत चॅटिंग करत असतो .व्हाट्सअप ला कुणाचे किती मेसेज आलेले आहे हे वारंवार बघत असतो .असे जर सतत आपण करत असू तर लवकरच आपण मानसिक विकाराने ग्रस्त होऊ यात शंका नाही. स्मार्टफोन हे जगाशी जोडणारा यंत्र आहे .त्याचा वापर जपून केलेला कधीही चांगला पण यातून असं दिसून येत आहे की मोबाईलचा वापर आपण न करता मोबाईल आपला वापर करत आहे. आजची तरुण पिढी ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात बसून दिसते. एका जागेवर बसली तर उठत सुद्धा नाही .यामधून बऱ्याचशा समस्या उद्भवत चाललेल्या आहेत. जसे लठ्ठपणा , नेत्रदृष्टी कमी होणे आणि मानसिक विकृती सारख्या समस्या यांना आपण जन्म देत आहोत.

मि या सर्वा च्या विरोधात नाही पन आपण मोबाईल चा चांगला वापर करावा ना की मोबाईल ने आपला वापर करावा.

प्रमोद पडघन 

मु.पो.अडोळी ता.जी. वाशिम 

संपर्क 9075977239

B.S.W., M.S.W., M.A. (psychology ), P.G.D.P.C. and M.A.(yoga)

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️