Mukhyamantri Mazi Laadki Bahin Yojana Breaking News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज भरण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ ; आणि " या" महिलांना सुद्धा भरता येणार आता फॉर्म

Mukhyamantri Mazi Laadki Bahin Yojana Breaking News


महत्त्वाची घोषणा!

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेला Mukhyamantri Mazi Laadki Bahin Yojana Breaking News मुदतवाढ. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासननिर्णयात केलेल्या महत्त्वपूर्ण बदलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदन केले.[ads id="ads1"] 

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करु इच्छितो-

१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.[ads id="ads2"] 

२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

Mukhyamantri Mazi Laadki Bahin Yojana Breaking News

३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.


४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.


५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

Mukhyamantri Mazi Laadki Bahin Yojana Breaking News

६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

Mukhyamantri Mazi Laadki Bahin Yojana Breaking News

७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

महत्त्वाची घोषणा! मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासननिर्णयात केलेल्या...

Posted by Maharashtra DGIPR on Tuesday, July 2, 2024

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️