यावल तालुक्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत सर्व मंडळाचा समावेश करावा ;राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका

 


यावल ( सुरेश पाटील ) हवामानावर आधारित फळ पिका योजनेअंतर्गत अति तापमानाच्या निकषावर यावल तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा समावेश करावा अशी मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी,शेतकऱ्यांनी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर यांच्याकडे केली.[ads id="ads1"] 

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत अति तापमानाचा यावल तालुक्यातील सर्व महसुल मंडळांचा समावेश व्हावा. यावल तालुक्यातील केळी हे मुख्य पीक आहे.अनेक वर्षापासून केळी उत्पादक शेतकऱ्यावर अतिवृष्टी, चक्रीवादळ,गारपीट,या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.तसेच दीड महिन्यापासून संपूर्ण जळगांव जिल्ह्यात तापमानाने मोठा उच्चांक गाठला होता तापमानाचा पारा हा ४५ अंश सेल्सियेच्या पुढे गेला आहे.त्या अति तापमानामुळे केळी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.[ads id="ads2"] 

   यासाठी यावल तालुक्यातील महसूल मंडळाचा शासकीय किंवा इतर हवामान यंत्रणांचा अहवाल मागवून तापमानाच्या अहवालाची तपासणी करण्यात यावी. त्यानुसार विमा कंपनीच्या हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत अति तापमानाचा निकषात यावल तालुक्यातील सर्व मंडळांचा समावेश करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला आदेशित करावे. यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, विजय प्रेमचंद पाटील, अ.सईद भाई, हाजी अकबर खाटीक,अँड.कोमलसिंग पाटील,डी.पी.साळुंखे सर, अन्सारखा निसारखा, गिरीश शिरसागर,किरण पाटील, ललित पाटील, सहदेव पाटील, पांडुरंग पाटील, संतोष तायडे, निलेश बेलदार गजानन पाटील ज्ञानेश्वर पाटील,निवृत्ती पाटील, धनंजय धनगर, तुषार येवले, विनोद येवले,आदित्य येवले, करीम मण्यार,गजेंद्र पाटील, सुकलाल पाटील,चेतन पाटील, राकेश पाटील,नामदेव पाटील, कपिल पाटील, कदीरखान करीम खान, ललित विठ्ठल पाटील,बापू गोविंदराव जासूद,  विजय पुंडलिक साडी, प्रसन्न विठ्ठल पाटील,प्रशांत पाटील, जगदीश पांडुरंग पाटील, भाग्येश संतोष पाटील,अनिल निळकंठ जंजाळे,विजय रमेश पाटील,पितांबर महाजन,दगडू पाटील इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी यांची स्वाक्षरी आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️