यावल वनविभागात " वटवाघुळ " हत्येला उपवन संरक्षक,सहाय्यक वन संरक्षक हेच जबाबदार ?

 


यावल येथे पाचशे वर्षांपूर्वीच्या वटवृक्षावर दररोज शेकडो वटवाघुळांची होत आहे हत्या

यावल  ( सुरेश पाटील ) जळगाव येथे उपवन संरक्षक शेख जमीर शेख मुनीर व  सहाय्यक वनसंरक्षक यांचे अधिपत्त्या खाली यावल वनविभाग कार्यालय आहे आणि यांच्या कार्यक्षेत्रात म्हणजे यावल येथे वनक्षेत्रपालाच्या कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर दररोज एका प्राचीन भल्या मोठ्या वडाच्या झाडावर शेकडो वटवाघुळांची सर्रासपणे हत्या होत असल्याने याला जबाबदार उपवनसंरक्षक आणि सहाय्यक वन संरक्षक हेच जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.[ads id="ads1"] 

         याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथे नगरपालिकेपासून आणि यावल न्यायालयापासून हाकेच्या अंतरावर  तसेच यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपालाच्या मुख्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराणा प्रतापनगर मध्ये अंदाजे ४०० ते ५०० वर्ष वयाचे जुने मोठे वडाचे वृक्ष आहे या भल्या मोठ्या वडाच्या झाडावर / वृक्षावर दररोज अंदाजे ३०० ते ४०० वटवाघुळांचे येणे जाणे असून निवासस्थान सुद्धा आहे. अशा वटवाघुळ संस्थान प्राणी तथा कीटक भक्षक प्राण्यांची हत्या कोणीतरी अज्ञात आरोपी प्लॅस्टिक बारीक पक्क्या दोऱ्याची जाळी लावून वटवाघुळांची हत्या करीत असल्याने याकडे यावल वन क्षेत्रपालासह, सहाय्यक वन संरक्षक, उपवनसंरक्षक यांचे दुर्लक्ष होत असल्याने तसेच गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडत असल्याने याला जबाबदार हेच अधिकारी असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले आहे. [ads id="ads2"] 

          या भल्या मोठ्या वडाच्या झाडावर प्लॅस्टिकची पक्की न तुटणारी जाळी बांधणारे आरोपी कोण..? ते अज्ञात आरोपी वटवाघुळांची हत्या का आणि कशासाठी आणि कोणाच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे  करीत आहे..? हे मात्र नागरिकांना समजण्याच्या पलीकडे झाले असून अंधश्रद्धे बाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि हा सर्व प्रकार सुरू असताना एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना दिसून येत नाही का..? वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे गुप्त खबरी आहेत किंवा नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.

        वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ सुधारणा  २०२३ नुसार वटवाघुळ शेडूल २  मध्ये मोडते म्हणून कलम ५० नुसार संबंधित आरोपीला ७ वर्षे  सक्त मजुरीची शिक्षा अथवा १ लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

            संबंधित वन गुन्हा हा दखलपात्र व अजामीन पात्र आहे म्हणून कलम ९ प्रमाणे वन गुन्हा जारी करण्याचे कर्तव्य कलम ५० ( ब ) नुसार संबंधित यावल येथील पूर्व वनक्षेत्रपाल यांचे आहे.परंतु यावल वन विभागाचे मुख्य कार्यालय जळगाव येथे असलेले वनविभागाचे उपवन संरक्षक शेख जमीर शेख मुनीर यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले सहाय्यक वन संरक्षक प्रथमेश हाडपे यांनी करायला पाहिजे असा वन विभागाचा नियम असल्याची माहिती कर्तव्यनिष्ठ तसेच सेवानिवृत्त अधिकारी हेमंत छाचेड यांनी साप्ताहिक सुवर्ण दिप शी बोलताना दिली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️