कंपनीकडून / विक्रेत्याकडून शेतकऱ्याला उद्धट वागणूक
यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील कोळवद येथील शेतकऱ्यांने भुसावळ येथील एका प्रख्यात बी बियाणे दुकानातून ( शेतकऱ्या कडे बियाणे खरेदीचे बिल आहे ) नावाजलेल्या कंपनीचे तूर पिकाचे बियाणे गेल्या १५ दिवसांपूर्वी खरेदी करून आपल्या शेतात तुर पेरणी केली असता तुर पिक उगवले नसल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त केला आहे कंपनीच्या संबंधित माणसांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता कंपनीमार्फत शेतकऱ्याला उडवा उडवीची उत्तरे देऊन यात कंपनी आणि तुम्ही एकमेकाचे काहीच करू शकणार नाही असा सल्ला दिला. व शेतकऱ्याचे झालेले आर्थिक नुकसान व पेरणीची जी वेळ वाया गेली त्याबाबत पर्यायी व्यवस्था न केल्याने याबाबत आता तालुका कृषी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काय कारवाई करणार..? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads1"]
कोळवद येथील वैभव राणे यांनी माहिती देताना सांगितले की शेट गट नंबर ४२२ / १, ५३९ / १ , व ५४० मध्ये तुर पेरणी करण्यासाठी दि. २७ मे २०२४ रोजी भुसावळ येथील एका प्रख्यात दुकानातून प्रसिद्ध कंपनीचे तूर बियाणेचे एकूण ७ पाकीट आणि त्यानंतर ३ जून २०२४ रोजी एक पाकीट ( एका पाकिटाची किंमत ४०५ रुपये असलेली ) विकत घेतले आहे.दि २७ मे २०२४ रोजी तूर बियाणे शेतात पेरणी केली परंतु बियाणे न उगवल्याने बियाणे विक्रेत्याकडे रीतसर तक्रार केली असता बी बियाणे कंपनी / किंवा विक्रेत्या तर्फे संबंधित कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष शेतात व शेतकऱ्याची भेट घेऊन पाहणी केली असता बियाणे न उगवल्याने यात बी बियाणे कंपनी आणि बियाणे विक्रेता काहीच करू शकणार नाही आणि तुम्ही सुद्धा कंपनीविरुद्ध काहीही करू शकणार नाही अशा सल्ला देऊन बी बियाणे कंपनीसह बियाणे विक्रेत्यांनी आपली जबाबदारी शेतकऱ्याच्या अंगावर झटकून शेतकऱ्याची प्रत्यक्ष फसवणूक केल्याचे प्रत्यक्ष प्रथमदर्शनी आणि या वर्षातले पहिले उदाहरण यावल तालुक्यात दिसून आले आहे.[ads id="ads2"]
संबंधित शेतकरी तालुका कृषी अधिकाऱ्यांसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडे आणि लोकप्रतिनिधी कडे तक्रार करणार असून या तूर बियाण्याची उगवण क्षमता नव्हती का..? तूर बियाणे बोगस कंपनीचे आहे का..? किंवा विक्रेत्याने तुर बियाणे मुदत झाल्यानंतर ( एक्सपायर डेट नंतर ) विक्री केले आले आहे का.? आणि जर शेतकऱ्याकडे बियाणे खरेदीचे बिल आहे तर पुढील कार्यवाही काय होणार.? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध काय कारवाई होणार..? याकडे आता संपूर्ण भुसावळ परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून आहे.