यावल तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा समावेश अति तापमानाच्या निकषात करा - भावी उमेदवार धनंजय चौधरी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकारीकडे मागणी


यावल( सुरेश पाटील )

अति तापमानाच्या निकषात यावल तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा समावेश करणे बाबत यावल रावेर तालुक्याचे भावी नेतृत्व तथा उमेदवार धनंजय चौधरी यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.[ads id="ads1"] 

        आज बुधवार दि.१२ जून २०२४ रोजी रावेर विधानसभा मतदार संघातील भावी उमेदवार तथा शेतकरी आणि आमदार शिरीषदादा चौधरी यांचे पुत्र धनंजय शिरीष चौधरी ( खिरोदा ) यांच्यासह लीलाधर विश्वनाथ चौधरी ( भालोद ),सतीश हरिश्चंद्र पाटील(बोरावल खु.),ज्ञानेश्वर श्रीधर बऱ्हाटे ( पाडळसे ),केतन दिगंबर कि रंगे ( फैजपूर ) भूषण घनश्याम भोळे ( हिंगोणा ) यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,[ads id="ads2"] 

  यावल व रावेर तालुक्यात केळी मुख्य पिक आहे.गेल्या पाच ते सहा वर्षापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अतिवृष्टी, चक्रीवादळ,गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले गेले आहे.तसेच आपणास ज्ञात आहे की,गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हयात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पसरली होती आणि उष्णतेचा पारा ४५ अंश सेल्सियशच्या पुढे गेलेला आहे.त्यामुळे अति तापमानामुळे यावल व रावेर तालुक्यातील केळी उत्पादकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.

त्यासाठी यावल तालुक्यातील महसूल मंडळांच्या शासकीय किंवा इतर हवामान यंत्रांचा अहवाल मागवून अहवालाची तापमानानुसार तपासणी करण्यात यावी आणि त्यानुसार विमा कंपनीच्या हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेअंतर्गत अति तापमानाच्या निकषात यावल तालुक्यातील सर्व मंडळांचा समावेश करुन शेतकयांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कंपनीला आदेश करावा अशी मागणी केली आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️