सरपंच पतीने धमकावल्याची फैजपुर पोलिसात तक्रार दाखल
यावल ( सुरेश पाटील ) यावल तालुक्यात अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायत मधील सरपंच,उपसरपंच,सदस्यांच्या आणि इतर कार्यालयातील काही महिला पदाधिकाऱ्यांचे पतीदेव आपल्या पत्नीच्या शासकीय कामकाजात हस्तक्षेप करून,पत्नीच्या पदाचा दुरुपयोग व त्यांच्या प्रभावाखाली सोयीनुसार कामे करून घेत असल्याचे त्यांनीच काढलेल्या छायाचित्रावरून बऱ्याच वेळा प्रत्यक्ष दिसून आले आहे.आणि याबाबतची प्रत्यक्ष घटना आता पाडळसे येथील ग्रामपंचायत कारभारात घडल्याची घटना दाखल तक्रारीवरून समोर आली आहे. [ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यात पाडळसे येथील ग्रामपंचायत सदस्य सुदेश कडू बाविस्कर यांनी मासिक सभेत सरपंच सौ. गुणवंती सूरज पाटील यांना कामाबद्दल आणि झालेल्या खर्चाबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने महिला असलेल्या सरपंच पती सूरज मनोहर पाटील यांनी सुदेश बाविस्कर यांच्या घराजवळ त्यांना शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
याबाबतची तक्रार दि.१९ जून २०२४ रोजी फैजपूर पोलिस स्टेशनला दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]
याबाबत सरपंच पती सूरज पाटील यांनी सांगितले की, माझ्या वाड्यातील पिंपळाच्या फांद्या मजूर तोडत असताना ते पाहण्यासाठी गेलो असता, सुदेश बाविस्कर यांनी मला मज्जाव केला.ते म्हणाले की, तो अधिकार आम्हा सदस्यांचा असून ते काम पाहण्याचा तुला अधिकार नाही.मी त्यांना समजावले की,नागरिक म्हणून काम पाहू शकतो याचाच राग सुदेश बाविस्कर यांना आल्याने त्यांनी तक्रार दाखल केली.असे सूरज पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
परंतु काही ठिकाणीचे महिला सरपंच यांचे पती आपल्या पत्नीच्या सरपंच पदाचा कारभार पाहताना स्वतः पत्रव्यवहाराचे, देवाण घेवाणाचे कामकाज करून स्वतः चमकोगिरी करून तसे अधिकाऱ्यांसोबत छायाचित्र काढून प्रसिद्ध करून घेत असल्याचे बऱ्याच वेळा दिसून आले आहे हे संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही का असा प्रश्न उपस्थित होत असून यावरून महिला सरपंच पदाचा आणि अधिकाराचा गैरफायदा कसा घेतला जात आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.