यावल येथील राजे निंबाळकर यांच्या किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा संपन्न

 


एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम

यावल दि.७ ( सुरेश पाटील )

यावल येथील राजे निंबाळकर यांच्या किल्ल्यावर काल गुरूवार दि.६ जून २०२४ रोजी एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान तर्फे तसेच यावल शहरातील सकल हिंदू बांधवांतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रम व  भव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]  

       एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान व सकल हिंदू समाज यावल आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा २०२४... दि.६ जून २०२४ रोजी दरवर्षीप्रमाणे यावल शहरात राजे निंबाळकर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला या कार्यक्रमात शहरातील श्याम शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या मूर्तीचे राज्याभिषेक पूजन शास्त्रोक्त पद्धतीने करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.. पुजनासाठी अथर्व बयानी महाराज यांनी सहकार्य केले.. त्यानंतर किल्ल्याच्या पायथ्यापासून यावल शहरातून मेन रोड वरून शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. [ads id="ads2"]  

  शोभायात्रा मध्ये चुंचाळे येथील गुरुमाऊली भजनी व म्युझिकल बँड सोबत वडोदा येथील महिलांचे व पुरुषांचे भजनी मंडळ त्यानंतर शिवरायांची पालखी, शिवरायांचा सजीव देखावा, बुरझड जि-धुळे येथील सरस्वती बँड,छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे या शोभायात्रेमधील विशेष आकर्षण ठरले...पुणे येथील प्रवीण चौधरी यांनी शिवरायांची भूमिका साकारली.. कार्यक्रमाची सांगता बोरावल गेट येथील शिवतीर्थ स्थळाजवळ झाली... शिवतीर्थ येथे सर्वात आधी "शिवरायांचा प्रताप" हे नाटक साजरे करण्यात आले..या नाटकासाठी धनराज कोळी,खेमराज करांडे,कुणाल चित्ते,ललित बारी,स्वामी चौधरी यांनी सादरीकरण केले.. त्यानंतर शिवतीर्थावर शिव वंदना व ध्येयमंत्र घेऊन डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते शिव आरती घेतली गेली..व पुणे येथील शिवभक्त समाधान लाड यांनी शिवगारद घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अभय गणेश रावते, उपाध्यक्ष -योगेश वारूळकर, धीरज भोळे,प्राचीताई पाठक, धनंजय बारी,सागर चौधरी,मनसे शहराध्यक्ष अजय भाऊ तायडे,पंकज जोहरी, दीपक वारूळकर,निलेश बारी, सोहम बारी,गोपी बारी,संदीप रेघे,गोलू बारी,सागर लोहार, चेतन बारी,गौरव बारी,ज्ञानेश्वर जाधव,मयूर बारी यांनी मेहनत घेतली..असंख्य अशा शिवभक्तांनी या कार्यक्रमात उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवून मोठ्या उत्साहात श्री छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला.. या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त चोख ठेवला त्यातून त्यांचे सहकार्य सुद्धा सहकार्य लाभले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️