विटवे येथे डॉ, पंजाबराव देशमुख संजीवनी पंधरवडा निमित्त कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 26 जून रोजी विटवे येथे विठ्ठल मदिंर येथे डॉ. पंजाबराव देशमुख संजीवनी पंधरवडा निमित्त कृषी विभागा  मार्फ़त, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनानांची माहिती व्हावी यासाठी विशेष मोहिम 17 जून 2024ते 1जुलै 2024 या काळात  राबवण्यात आला आहे. [ads id="ads1"] 
  या प्रसंगी रावेर कृषी विभागातील कृषी सहाय्यक  शेखर वाघ व कृषी पर्यवेक्षक के. पी. पाटील यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत केळी लागवड योजना, गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजना, ट्रक्टर, शेतीविषयक साहित्य या सन्दर्भात सखोल अशी माहिती दिली.[ads id="ads2"] 
   या वेळी विटवे गावाचे लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी, उपसरपंच ईश्वर चौधरी ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेड़े, मधुकर पाटील, व गावातील प्रगतिशील शेतकरी रविंद्र वेडु चौधरी, कडु पाटील, राजू कोळी, रणजीत चौधरी , रोजगार सेवक सिताराम वानखेड़े,  चौधरी उखरड़ू कोळी, श्रीराम चौधरी, बचत गट महिला, सविता मनुरे, शारदा पाटील, ललीत कोळी, अभिजीत चौधरी राजू कोळी, गोपाल चौधरी सागर पाटील  व गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️